जळगाव : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन व बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स असोसिएशनच्यावतीने नेहरु चौकातील झोनल कार्यालयाजवळ द्वार सभा घेण्यात येऊन निदर्शने करण्यात आली. दरम्यान, बहुतांश बँक कर्मचारी संघटना संपात सहभागी न झाल्याने त्या बँकांचे व्यवहार सुरु होते. काही बँका बंद असल्या तरी त्यांचे व्यवहार ठप्प झाले होते.या वेळी देशाची आर्थिक स्थिती व त्यामुळे बँकिंग क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती देण्यात आली. या सोबतच विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाआपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव रोड शाखा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही निदर्शने करण्यात आली व जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष मोहन खेवलकर, नितीन जैन, प्रतीक देव, धन:श्याम कुलकर्णी, सौमी जाना, हीना चव्हाण, कमलाकर शिंदे, भगवान जगताप, नितीन रावेरकर, सविता यादव यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.बँका सुरू, व्यवहार ठप्पशहरातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन शाखांपैकी मू.जे. महाविद्यालय परिसरातील व बांभोरी येथील शाखेचे अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्या बँकांचे व्यवहार बंद होते, मात्र मध्ये कामकाज सुरू होते.या आहेत मागण्यासार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, बँकांचे एकत्रीकरण तसेच खाजगीकरण करण्यात येऊ नये, बँकांच्या ठेवीवरील व्याजदर, वाढविण्यात यावे, बँकांमधील थकीत मोठ्या उद्योगांकडील पूर्ण कर्ज वसूल करण्यात यावे, कोट्यावधी बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यात यावी, कायमस्वरुपी काम बाह्यस्त्रोत केले जाऊ नये, कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करण्यात येऊ नये.
बँक कर्मचारी संघटनांतर्फे निदर्शने व मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:07 PM