शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

जळगावात पुन्हा डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:07 PM

विजयकुमार सैतवालकधी नव्हे एवढ्या प्रमाणात गेल्या वर्षी कहर करीत शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या डेंग्यूने यंदाही पाय पसरविण्यास सुरुवात केली असून हजारो घरात डेंग्यूच्या आळ््या आढळल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपासून आरोग्य विभागाच्यावतीने फवारणी, धुरळणी केली जात असली तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.गेल्या वर्षी ...

विजयकुमार सैतवालकधी नव्हे एवढ्या प्रमाणात गेल्या वर्षी कहर करीत शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या डेंग्यूने यंदाही पाय पसरविण्यास सुरुवात केली असून हजारो घरात डेंग्यूच्या आळ््या आढळल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपासून आरोग्य विभागाच्यावतीने फवारणी, धुरळणी केली जात असली तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.गेल्या वर्षी शहरामध्ये डेंग्यू आजाराने कहर केला होता. रक्त तपासणीचा अनुभव पाहता दररोज किमान १० डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे त्या वेळी दिसून आले होते. त्यामुळे मनपाच्यावतीने कित्येक दिवस सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या वर्षाचा हा अनुभव पाहता यंदा उपाययोजना वाढणे गरजेचे आहे. मात्र हा अनुभव गांभीर्याने घेतला जात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलै व आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या. यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले. यात भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागन झाली. या मुळे बालकाचे कुटुंब भयभीत होण्यासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर लगेच आदर्शनगरातील एका तरुणास डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. या सोबतच मनपाच्या आरोग्य विभागाकडे १७ रुग्ण असल्याच्या तक्रारी आल्या. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या पुन्हा चिंतेची बाब बनत आहे. मनपाच्यावतीने आतापर्यंत २२ हजार ६७४ घरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. सुमारे ७१ हजार ६५० भांडे हे दुषित आढळून आले आहेत. ज्या १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश घरे हे उच्चभ्रु भागातील आहे. या सोबतच शहरातील मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. ज्या भागात डेंग्यू असल्याच्या तक्रारी येत आहे, तेथे महापालिकेच्यावतीने अबेटिंग व फवारणी केली जात आहे, मात्र इतर भागांचाही मनपाच्या आरोग्य विभागाने विचार करून तेथे अबेटिंग व फवारणी करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव