जळगाव : शहरात डेंग्यू व डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे सुद्धा तापाने फणफणले असून त्यांनाही डेंग्यू झाल्याचे सोमवारी रात्री स्पष्ट झाले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याच्या वृत्तास डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे.सलग तीन दिवसांपासून ताप येत असल्याने जिल्हाधिकारी निंबाळकर हे रविवारी रात्री साडेनऊ वाजता एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे, रात्री त्याचा अहवालही प्राप्त झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी ‘लोकमत’ ला दिली.छत्रपती संभाजी राजे बंदिस्त नाट्यगृहात रविवारी आयोजित नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी जिल्हाधिकारी निंबाळकर गेले होते. तेथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ताप जास्त असल्याने शहरातील एका डॉक्टरांशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. रविवार असल्याने रात्री औषधीची दुकाने बंद होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला. रात्रीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सकाळी रक्ताच्या चाचण्या केल्या असता त्यात डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले.डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूचा कहरशहरात डेंग्यू, मलेरिया व स्वाइन फ्लूने कहर केला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. खुद्द जिल्हाधिकाºयांनाही आता डेंग्यू झाल्याने किमान आता तरी प्रशासन जागे होईल व उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:17 PM
खासगी दवाखान्यात उपचार
ठळक मुद्देडॉक्टरांनी दिला दुजोराडेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूचा कहर