जळगाव - शहरात गेल्या महिनाभरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून शहरात फवारणी व धुरळणी सुरु असून, प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान शहरातील उच्चभ्रू वस्तीतील १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत.शहरात डेंग्यू फोफावत असून मनपाला उशीरा का होईना अखेर जाग आली आहे. २४ आॅगस्टपासून मनपाने शहरात फवारणी व धुरळणी सुरु मोहीम हाती घेतली आहे. दोन आठवड्यापुर्वी झालेल्या पावसामुळे डेंग्यूच्या अळ्यांची निर्मीती झाली होती. फुलांच्या कुंड्या, गच्चीवर पडलेल्या भांड्यामध्ये साचलेल्या पाण्यात या अळ्यांची निर्मीती झाली असल्याचा दावा मनपाकडून करण्यात आला असून, ज्या घरांमध्ये अळ्या आढळल्या आहेत. त्या ठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आली.या भागांमधील घरांमध्ये आढळल्या अळ्याज्या १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश घरे हे उच्चभ्रु भागातील आहे. यामध्ये भोईटे नगर, आदर्श नगर, गणपती नगर, गणेश कॉलनीतील घरांचा समावेश आहे. डेंग्यूच्या अळ्या या प्रामुख्याने चांगल्या पाण्यात तयार होतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील कुंड्यामध्ये पाणी साचणार नाही. याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
जळगावात उच्चभ्रू वस्तीतील १ हजार घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 7:58 PM
गेल्या महिनाभरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून शहरात फवारणी व धुरळणी सुरु असून, प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान शहरातील उच्चभ्रू वस्तीतील १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
ठळक मुद्देमलेरिया विभागाकडून तपासणी सुरुडेंग्यू सदृश्य आजाराचे २७ रुग्ण आढळलेमनपाकडून शहरात धुरळणी मोहिम सुरु