जळगाव : पावसाळा आटोपल्यानंतर डेंग्यूने डोके वर काढले असून शासकीय आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर दरम्यान शहरात डेंग्यूचे ४५ रूग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहे़त़ यातील ३० हून अधिक रूग्ण हे गेल्या दीड महिन्यातील आहेत़ ८३ रूग्ण हे संशयित आहेत़ दरम्यान, कागदावर ४५ रूग्ण असले तरी प्रत्यक्षात शहरातील रूग्णांचा आकडा २०० पेक्षा कितीतरी अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे़स्वच्छ पाण्यात जन्म घेणाऱ्या एडीस इजिप्ती या डासामुळे फोफावरणाºया डेंग्यूने शहरात उच्छाद मांडल्याचे चित्र आहे़ शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये संशयित रूग्ण आढळत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ शासकीय उपायोजनांसाठी सर्व खासगी रूग्णालयांना डेंग्यू सदृश्य रुग्णांची नावे व माहिती शासकीय रूग्णांलयांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे़ मात्र, मोजकीच आकडेवारी समोर येत असल्याने रूग्ण अधिक असूनही कागदावर मात्र रूग्णांची संख्या कमी दिसत आहे़ महापालिका प्रशासनाने नुकताच तपासणी अहवाल जाहीर केला होता त्यात शहरातील तीन हजाराहून अधिक घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या़ त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत़ मात्र, खासगी रूग्णालयात डेंग्यू सदृश्य आजाराचे रूग्ण गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरात आजही डेंग्यूचे किमान २०० रूग्ण असल्याचे सांगितले जात आहे़ही काळजी घ्यापरिसर स्वच्छ व कोरडा ठेवा, पाणी साठू देऊ नका, स्वत:चा मच्छरांपासून अधिकाधिक बचाव करा, फ्रीजचे मागचे भांडे, कुलर, कुंड्या, फेकलेले नारळ, टायर यामध्ये पाणी साचल्यास या ठिकाणी हे डास जन्म घेतात त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचू देऊ नका, घरातील सर्व भांडी हप्त्यातून एक दिवस धुवून कोरडे करून ठेवा.८२ खासगी डॉक्टरांचा व्हॉट्स अॅप ग्रुपडेंग्यू, हिवतापाचे संशयित रूग्ण आढळल्यास तत्काळ शासकीय यंत्रणेला कळविणे खासगी रूग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे़ त्या पार्श्वभूमीवर पालिका रूग्णालयाच्या यंत्रणेने शहरातील ८२ खासगी डॉक्टरांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून यावर नियमित अपडेट टाकल्या जातात, यानुसार शहरातील नेमक्या कोणत्या भागात संशयित रूग्ण आहेत, याची माहिती तत्काळ मिळून त्यानुसार त्या भागात पालिकेतर्फे उपाययोजना केल्या जातात़ही आहेत लक्षणे...थंडीवाजून ताप येणे, अंगावर बारीक पुरळ येणे, हातपाय, डोके दुखणे, उलटी होणे आदी लक्षणे दिसतात. रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, औषधांना रुग्णाचा प्रतिसाद न मिळणे आदी परिणाम होतात. तसेच प्लेटलेट कमी झाल्यामुळे क्वचितप्रसंगी रुग्णाच्या नाका-तोंडातून रक्तही येते. त्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती क्षीण होते. ‘एडिस इजिप्ती’ जातीच्या डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होतो.शासकीय आकडेवारी नुसार जानेवारी ते आॅक्टोबर दरम्यान, ८३ रूग्ण हे संशयित आढळून आले होते़ त्यारूग्णांच्या रक्ताचे नमूने हे औरंगबाद येथे पाठविण्यात आले त्यापैकी ४५ रूग्णांना डेंग्यूची लागण असल्याचे समोर आले़ मात्र वर्षाच्या सुरवातील अगदीच एक दोन रूग्ण आढळून आले होते़ सप्टेंबर व आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत तीस पेक्षा अधिक रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहेत़ या दीड महिन्यातच रूग्णांची संख्या वाढल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ़ मनिषा उगले यांनी दिली़शहरातील ९८ हजार घरांमध्ये घरातघरात जाऊन भांड्यांची तपासणी केली ती खाली केली़ नागरिकांना जनजागृतीसाठी हस्तपत्रके वाटून जनजागृती केली आहे़ आवश्यक त्या ठिकाणी अबेटींग केले आहे. अबेटींगचा साठा मुबलक प्रमाणात आहे.-डॉ़ विकास पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा
जळगावात डेंग्युचा डंख :२०० वर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:33 PM