भुसावळ जि. जळगाव : येथील एका खासगी कंपनीत कार्यरत युवकास डेंग्यूची लागण झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, सदर युवकास डेंग्यूची लागण ही बाहेरगावी झाल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे.नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मुळ रहिवासी असलेल्या या युवकास गेल्या चार-पाच दिवसांपासून ताप येत होता. त्याने प्रथम छोट्या दवाखान्यात उपचार घेतले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, शेवटी तो सोमवार, दि. ६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता आनंद नगरातील डॉ. राहूल जावळे यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी आला. डॉ. जावळे यांनी त्याच्या रक्ताच्या तपासण्या केल्या असता डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सदर युवकाला या दवाखान्यात दाखल करून घेण्यात आले आहे.त्या रुग्णास भुसावळ येथे संसर्ग झाला नाही - दोरकुळकरडेंग्यूबाधीत रुग्ण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून तो पाचोरा येथे कंपनीत कामाला आहे .मात्र त्या कंपनीचा मालक भुसावळ येथील असल्यामुळे त्या रुग्णास येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याला भुसावळ येथे संसर्ग झाला नसल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
भुसावळ शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:09 AM
भुसावळ शहरात डेंग्यूने बाधीत रुग्ण आढळून आला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देबाधीत रुग्ण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी खासगी रुग्णालयात उपचार सुरु