ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27 - देवीदास कॉलनीत राहणारे दीपक श्रीहरीसा भारोटे (वय 49) यांचा त्यांच्या बंद घरात मंगळवारी सकाळी 11 वाजता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.भारोटे हे प}ीपासून विभक्त राहत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेतच ह्दयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मृतदेहाच्या बाजूलाच दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
दीपक भारोटे व प}ी योगिता यांच्यात मतभेद असल्याने दोघंही विभक्त राहत होते. दीपक वरच्या मजल्यावर राहत असल्याने त्याच इमारतीत प}ी शिकवणी घेण्यासाठी दररोज येत होत्या. योगिता या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. दीपक हे जैन कंपनीत कामाला होते, मात्र ब:याच दिवसापासून त्यांनी कामावर जाणेही बंद केले होते.
घरातून दरुगधी येत असल्याने शेजारच्या महिलेने योगिता यांना शाळेत असताना फोन केला. त्यांनी घरी येवून पाहिले असता आतून दरवाजा बंद होता. कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी भाऊ सौरभ बाळकृष्ण काशिव यांना फोन करुन बोलावून घेतले होते. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.