लोकमत न्यूज नेटवर्करावेर, जि.जळगाव : निमाड प्रांतातील व यावल-रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणाऱ्या वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्या पांडुरंगाशी तदाकार झालेल्या पायी वारी दिंडींचे मोठ्या भावभक्तीने मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील खानापूर येथून बुधवारी सकाळ सातला प्रस्थान झाले.या पायी वारी दिंडी सोहळ्याला तब्बल ३५ वर्षांची परंपरा लाभली आहे. दुर्गादास नेहते महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच तर तब्बल ३५ वर्षांची पायी वारीची अखंड परंपरा असलेले विणेकरी भगवंत महाराज यांच्या साथसंगतीत या पायी वारी दिंडी सोहळ्याने चिनावलच्या पहिल्या मुक्कामाकडे मार्गक्रमण केले आहे.धगधगत्या उन्हातील दुष्काळाची दाहकता कमालीची गंभीर होत असताना व खरीपाच्या पेरणीचे भवितव्य अंधारात असताना संसारातील सुखदु:ख पंढरीच्या कानडा विठ्ठलाच्या चरणी समर्पित करून, त्रैलोक्याचा राणा सख्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बुधवारी बºहाणपूर, रावेर व यावल तालुक्यातील वैष्णवांनी पायी वारी दिंडी सोहळ्यासाठी कंबर कसली आहे. वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थान (चिनावल-पंढरपूर)च्या पायी वारी दिंडीची धुरा सांभाळणारे अरूण महाराज (बोरखेडकर) हे ब्रम्हलीन झाल्याने त्यांच्या आशिवार्दाने खिर्डी येथील दुर्गादास नेहते महाराज यांच्या नेतृत्वाखाली या दिंडीचे खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून गावात नगरप्रदक्षिणा घालून प्रस्थान झाले.तत्पूर्वी खानापूर येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी रात्री दुर्गादास नेहते महाराज यांचे प्रास्ताविक कीर्तन झाले. नंतर दिंडींने ध्वजपताका खांद्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात ‘रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी’चा गजर करीत गावाला नगरप्रदक्षिणा घातली. दरम्यान, बसथांब्यासमोरील जि प आरोग्य उपकेंद्राच्या आवारात हा दिंडी प्रदक्षिणा सोहळा विसावला. यावेळी विणेकरी हभप भगवंत महाराज यांच्याकडून कांदा पोह्यांचा उपहार व चहापानाची सेवा समर्पित करण्यात आली. दरम्यान, खानापूर भजनी मंडळातर्फे श्री क्षेत्र पंढरपूर येथील गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांचा सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र पंढरपूर येथील गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांच्या हस्ते दिंडीचालकांचे पूजन करण्यात आले.वाघोड भजनी मंडळ, रावेर येथील वारकरी कांतीलाल महाराज यांच्या कडून, डेलीभाजी मार्केट मंडळ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळाकडून तथा विवरे बुद्रूक येथील प्रा.जनार्दन पाचपांडे यांच्याकडून फराळ तथा केळी, आंबा, टरबूज, खरबूज फळांचा अल्पोपाहाराची सेवा बजावण्यात आली.आजच्या चिनावल मुक्कामानंतर हंबर्डी, खडके, जामनेर, भारूडखेडा, गोळेगाव, सिल्लोड, भोकरदन, केदारखेडा, बावनापांगरी, जालना, अंबड, शहागड, पाडळसिंगी, बीड, उदंड वडगाव, पारगाव, भूम, कोरेगाव, बार्शी, वडशिंगी, उपळाई, आष्टी या २३ मुक्कामानंतर आषाढ शुद्ध तृतीयेला ५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरी हा पायी वारी दिंडी सोहळा विसावेल.या दिंडी सोहळ्यात गायनाचार्य म्हणून संजय महाराज (विटवे), अमोल भंजाळेकर महाराज (रावेर), जितेंद्र महाराज (पुनखेडा)तर मृदंगाचार्ष म्हणून चंद्रकांत महाराज निंबोल व जीवन महाराज यांची साथसंगत लाभणार आहे. खानापूर येथील निर्मलाबाई धांडे यांनी घनश्याम धांडे यांच्या स्मरणार्थ ट्रॅक्टरची तर रोझोदा येथील कामसिध्द महाराज देवस्थानतर्फे टँकरची सेवा पुरवण्यात आली आहे.खानापूर, कर्जोद, वाघोड, भोकरी, केºहाळे, रावेर, विवरे, वडगाव येथील आबालवृद्ध महिला पुरूष भाविकांनी गावकुसापर्यंत, वेशीपर्यंत, मैल दोन मैल तथा थेट चिनावल मुक्कामापर्यंत सहभागी होऊन पायी दिंडी वारीला निरोप देत सख्या पांडुरंगाच्या भक्तीची आस मिटवली.
खानापूरहून वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानच्या दिंडीचे भक्तीभावात पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 4:59 PM
निमाड प्रांतातील व यावल-रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणाऱ्या वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्या पांडुरंगाशी तदाकार झालेल्या पायी वारी दिंडींचे मोठ्या भावभक्तीने मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील खानापूर येथून बुधवारी सकाळ सातला प्रस्थान झाले.
ठळक मुद्देदुष्काळाची कास अन् पेरणीची आस सोडून विठ्ठलरूपी झालेल्या वैष्णवांनी धरली पंढरीची वाटदिंडीला ३५ वर्षांची परंपराठिकठिकाणी मुक्काम करीत दिंडी ५ जुलैला पंढरपूरला पोहोचणार