जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात दरमहा दुसऱ्या सोमवारी १४ डिसेंबर रोजी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००००००००००००००००
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा नियोजन समिती यांच्यातर्फे अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत क्रीडांगण विकासासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पात्र अनुसूचित जाती संवर्गासाठी कार्यरत सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे आदींनी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.
००००००००००००००००
नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभागाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवी दिल्ली येथील केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळातर्फे होणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.