1 मार्चपासून रजा : येत्या 3 एप्रिल रोजी होणार रूजू
जळगाव, दि.30-जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी हे येत्या शनिवार्पयत वैद्यकीय रजेवर आहे. ते येत्या 3 एप्रिल रोजी म्हणजेच सोमवारी रूजू होणार आहे.
मागील 1 मार्चपासून वाणी हे रजेवर आहे. त्यांचा मुलगा कल्पेश याचे 5 मार्च रोजी लग्न झाले. यानिमित्त वाणी हे रजेवर गेले होते. ते 13 मार्च रोजी रूजू होणार होते, पण कुठल्याशा कारणानिमित्त त्यांनी रजा वाढविली. 13 पासून ते वैद्यकीय रजेवर गेले. त्यांची रजा येत्या शनिवारी संपत असून, ते पुढील सोमवारी कार्यालयात रूजू होतील, अशी माहिती आहे.
वाणी घरीच
नंदकुमार वाणी यांची 29 रोजी मुंबईत केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी होईल, असे सांगितले जात होते, पण वाणी हे 29 रोजी म्हणजेच बुधवारी शहरातील आपल्या घरीच होते.
अद्याप कारवाईचा प्रस्ताव नाही
सीबीआयने जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत नोटाबदली प्रकरणात जि.प.तील शाखा अभियंता नंदकुमार पवार, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची चौकशी केल्यानंतर या तिघांची बदली करण्यात आली. नंदकुमार वाणी यांचीही याच प्रकरणात चौकशी झाली असून, त्यांची बदली किंवा त्यांच्यावर इतर कारवाईसंबंधी जि.प.प्रशासनाने बुधवार्पयत कोणताही प्रस्ताव, पत्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाला सादर केलेले नव्हते. वाणी यांच्यावर कारवाईचे अधिकारी हे ग्रामविकास विभागाला असल्याचे जि.प.तर्फे सांगण्यात आले.