घाणीचे साम्राज्य : गृहपालाकडून तक्रारींना केराची टोपली
जळगाव,दि.31- शासनाकडून आदिवासी वसतीगृहासाठी निधी मिळतो, मात्र हा निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत आह़े गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े याबाबत गृहपालांकडे तक्रारी करून त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़
आदिवासी वसतीगृहात जामनेर नंदुरबार, रावेर, धुळे, नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ दोन इमारतींमध्ये एकूण 200 ते 250 विद्यार्थी संख्या आह़े याठिकाणी बोरिंग आहे मात्र बोरींगला कमी पाणी येत असल्याने दुसरी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही़
बीले काढली मात्र टँकर नाही
पाण्याच्या टाकीत कचरा पडल्याने पाणी अस्वच्छ आह़े पाणी शुध्दीकरण यंत्रही नादुरूस्त आह़े वसतीगृहात टँकर आणल्याबाबतची बीले काढली जातात मात्र प्रत्यक्षात टँकर येत नाही, याचप्रमाणे स्वच्छतेच्या वस्तू आणल्याची बीले तयार केली जातात मात्र कुठल्याही वस्तू सफाई कर्मचा:याला देण्यात येत नाही, असा आरोपही विद्याथ्र्यानी लोकमतशी बोलताना सांगितल़े
स्वच्छतेचे तीन तेरा
वसतीगृहात साफसफाईसाठी कर्मचारी येतो, मात्र त्याच्याकडून नियमित तसेच व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आह़े शौचालय कुठल्याही प्रकारचे फिनाईल, किंवा अॅसिड न वापरता धुतली जातात़ त्यामुळे दरुगधी येत आह़े डासांची उत्पत्ती झाली असतानाही फवारणी केली जात नसल्याने आजार वाढले आहे.
प्रकल्पधिका:यांना फोन करताच पिण्याचे पाणी
विद्याथ्र्याच्या परिक्षा सुरू आहेत, यातच वसतीगृहातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे विद्यार्थी त्रस्त आह़े रस्त्यांवरील पाणपोई, महाविद्यालयातून, जैन इरिगेशन येथून पाणी आणून पिण्याची वेळ आली आह़े याबाबत गृहपाल प्रविणकुमार रोकडे यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्याकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी रात्री वसतीगृहातील विद्याथ्र्यानी थेट आदिवासी प्रकल्प अधिका:यांना फोन करत समस्यांबाबत संताप व्यक्त केला़ त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास 10 अॅक्वाचे जार आणण्यात आल़े
दखल न घेतल्यास आमरण उपोषण
वारंवार तक्रारीकरून कुठल्याही प्रकारची कारवाई गृहपालांकडून केली जात नाहीय़े या समस्यांबाबत प्रकल्प अधिका:यांना निवेदन देण्यात येणार आह़े त्यानंतरही समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे उत्तम बागुल, रविंद्र गांगुर्डे, संजीव गावीत, राकेश पावरा, संदीप गावीत, राजू भोये, ज्ञानेश पाडवी, परशु महाकाळी यांनी दिला आह़े