जळगाव : दोन वेळा कोरोना अहवाल निगेटीव्ह येऊन जळगावातील रिंग रोड, शिक्षक वाडीतील रहिवासी व जि.प. प सदस्यांचे पुत्र नीलेश रामदास पाटील (३८) यांचे बुधवारी दुपारी न्युमोनियाने निधन झाले. ते शेलिनो एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते.त्यांना काही दिवस आधी न्यूमोनियाचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची दोन वेळा कोरोना तपासणी करण्यात आली ही तपासणी निगेटिव्ह आली होती.न्युमोनियामुळे त्यांच्या शरिरातील आॅक्सिजनची पातळी खालावली होती. नीलेश हे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी. पाटील व जि.प. सदस्या अरुणा पाटील यांचे पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.उमदे व्यक्तीमत्व असलेल्या निलेश हे एमबीए झाले होते. आता आठ दिवसात त्यांना पीएच.डी. जाहीर होणार होती. पण ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच न्यूमोनियाने त्यांना गाठले.
दोन वेळा रिपोर्ट निगेटीव्ह येऊनही जि.प. सदस्याच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:18 PM