पारोळा तालुक्यात अवैध गावठी दारू विक्री सर्रास होत आहे. यात राज्य दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षाने हे प्रकार घडत आहेत. तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीविरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचे समजते. दिनांक २४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पारोळा येथील पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर त्यांनी पोलिसांना तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीच्या किनारी शरद संतोष भिल (तामसवाडी) हा इसम गावठी दारूच्या भट्टीत दारू तयार करत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, पो. कॉ. सुधीर चौधरी, साबे व इतरांनी छापा टाकून आरोपीस रंगेहाथ पकडले व सुमारे ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
250521\25jal_4_25052021_12.jpg
===Caption===
तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट