जळगाव: जून महिन्याला प्रारंभ होताच मान्सूनपूर्व पाऊस व वादळाचातडाखा जिल्ह्यातील ८ तालुक्यांना बसला असून २,३, ५ व ६ जून या चारच दिवसांत जिल्ह्यातील ११५ गावांमधील ४७८९ शेतकºयांचे ३८५२ हेक्टरवरील पीक व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यात रावेर व मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान झाले असून पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे. दरम्यान ६ रोजी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील झालेल्या नुकसानीची आकडेवारी प्रशासनाकडे गुरूवार, ७ रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.जिल्ह्यात २ जून रोजी मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाºयांनी यावल, चोपडा, भडगाव, चाळीसगाव या भागात तडाखा बसला. त्यानंतर ३ जून रोजी चोपडा, पाचोरा तालुक्यांना, ५ जून रोजी रावेर, यावल तर ६ रोजी रावेर,मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांना वादळी वारा व पावसाचा जोरदार फटका बसला. याखेरीज भुसावळ,जळगाव व इतर तालुक्यांनाही फटका बसला. मात्र त्याची आकडेवारी प्रशासनाकडे सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसानरावेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३२ गावांमधील २०४० शेतकºयांचे १९५२ हेक्टरवरील केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्या पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावांमधील २१५२ शेतकºयांचे १५५६ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात १८ गावांमधील २२६ शेतकºयांच्या १५८.५० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील ७ गावांमधील ३० शेतकºयांचे २१.५ हेक्टर कागदी लिंबू व ४.५ हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील १० गावांमधील १४२ शेतकºयांचे ८६ हेक्टर केळीचे तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमधील ३१ शेतकºयांचे २५ हेक्टर केळी व २ हेक्टर कागदी लिंबूचे, चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांमधील १२३ शेतकºयांचे ४३.६२ हेक्टर केळी व १५.४४ हेक्टर लिंबू, १२ हेक्टर फळबागांचे असे ७१.०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर पाचोरा तालुक्यात ६ गावांमधील ४५ शेतकºयांचे १६ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाºयांनी केली पाहणीजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरूवारी भुसावळ तालुक्यातील तसेच रावेर तालुक्यातील काही नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यानुसार विमा कंपनी, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागामार्फत एकत्रितपणे पंचनामे सुरू झाले आहेत.वादळीवारे व पावसामुळे २ जून पासून आतापर्यंत नुकसानगावे शेतकरी पिके व क्षेत्र (हेक्टर)यावल १८ २२६ १५८.५० (केळी)रावेर ३२ २०४० १९५२ (केळी)बोदवड ७ ३० २६ (कागदी लिंबू व केळी)मुक्ताईनगर ३२ २१५२ १५५६ (केळी)चोपडा १० १४२ ८६ (केळी)भडगाव ४ ३१ २७(केळी व लिंबू)चाळीसगाव ६ १२३ ७१.०६(केळी, लिंबू व फळबाग)पाचोरा ६ ४५ १६ (केळी)एकूण ११५ ४७८९ ३८९२.५६
जळगाव जिल्ह्यातील ११५ गावांमधील ३८५२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:48 PM
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे सुरू
ठळक मुद्दे८ तालुक्यांना बसला तडाखा रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान