शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 5:36 PM

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला. शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांचे प्रतिपादनडॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख ठेवला श्रोत्यांसमोरसरस्वती व्याख्यानमालेस प्रतिसाद

चाळीसगाव, जि.जळगाव : आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला.शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले. आधुनिक भारताची प्रगती या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी केले. परिचय संचालक राजेश ठोंबरे यांनी करून दिला.आपल्या व्याख्यानात डॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख श्रोत्यांसमोर ठेवला. यासंदर्भात त्यांनी आपले विविध देशातील अनुभवदेखील श्रोत्यांना रंजक शैलीत सांगितले. भारत आज अण्वस्त्रधारी देश असून, अणुशक्तीचा वापर शांततेसाठी करण्याची कल्पना पं.नेहरूंनी मांडली. डॉ.होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. आज भारताने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. आज देशात अनेक ठिकाणी रिअ‍ॅक्टर्स आहेत. अणुशक्तीसाठी लागणारे जड पाणी भारतातच तयार होते. भारत त्याची निर्यात करून परकीय चलन मिळवतो. आज अनेक उपग्रह भारताने अंतराळात स्थापित केले असून, त्यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्य करून घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. एकाच वेळी अवकाशात १०८ उपग्रहांचे प्रक्षेपण भारताने केले आहे. आपलेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रहदेखील आपण प्रक्षेपित केले आहेत. संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात भारतीय तज्ज्ञ जगात आघाडीवर आहेत. अन्नधान्याच्या बाबतीतसुद्धा भारत स्वयंपूर्ण बनला आहे. १९५० मध्ये भारतातील लोकसंख्येपैकी केवळ १७ टक्के लोक साक्षर होते. आज हे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहचले आहे. भारतातील बुद्धिमान तरुणांनी कामानिमित्त विविध देशात जाऊन तेथे आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आहे. परंतु ही सर्व प्रगती भारताची नसून इंडियाची आहे. खऱ्या भारतासमोर आज अजूनही बºयाच समस्या आहेत. भारतातील अनेक लोकांना आजही दोन वेळेचे पोटभर जेवण मिळत नाही. रिकाम्या हातांना काम नाही. गरिबी, शेतकºयांच्या आत्महत्या इ.समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. या समस्या दूर करायच्या असतील तर आपण आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील नियोजन केले पाहिजे. तरच आपण प्रगती करू शकू. सिंगापूर, चीन, इस्रायल या देशांनी स्वत:ची बलस्थाने ओळखून त्याप्रमाणे आपली धोरणे ठरवली. म्हणून ते आज प्रगतीपथावर आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष शहा यांनी, तर प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव