जळगाव : विमानतळ परिसरात काही दिवसांपासून बिबट्यांनी तळ ठोकला असल्याने सोमवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहिम राबविली. तब्बल तीन ते चार तास बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावरही बिबट्याचा अधिवासाबाबत कोणतीही माहिती किं वा पुरावे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध होवू शकले नाही. दरम्यान, रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा विमानतळ परिसरात प्रवेश केल्याचे या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली आहे. विमानतळ परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्यांचे दर्शन झाले आहे. यामुळे या ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांमध्ये भीती असल्याने तब्बल २० दिवसांपासून या ठिकाणचे सर्व कामकाज ठप्प आहे. काही दिवसांपुर्वी एका बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाºयांनी पकडले होते. त्यानंतर त्या बिबट्याला जंगलात सोडून देण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा दुसरा बिबट्या या ठिकाणी दिसून आल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वनविभागाच्या २० जणांच्या टीमने संपूर्ण विमानतळ परिसराची पाहणी केली.
विमानतळ परिसरात वनविभागाची बिबट्यासाठी शोध मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:38 PM