जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. मात्र, भूसंपादनापोटी रेल्वेतर्फे दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी असल्यामुळे योग्य भाव मिळाल्यानंतरच रेल्वेला जमिनी देण्यावर जळगाव व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.भुसावळ ते मनमाड दरम्यान या तिसºया रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते जळगाव दरम्यानचे काम करण्यात आले. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रेल्वेतर्फे गेल्यावर्षी मे महिन्यापासून जळगाव ते मनमाड दरम्यानच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या १६० किलो मीटरच्या मार्गावर तिसरी रेल्वे मार्ग उभारण्यासाठी रेल्वेला अनेक शेतकºयांच्या जमिनी भूसंपादन कराव्या लागणार आहेत. यासाठी गेल्या वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरु आहे. मात्र, जळगाव तालुक्यासह पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीला योग्य भाव मिळाल्यावरंच जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे. भूसंपादना पोटी रेल्वेकडून योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे, अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. शेतकºयांंच्या मागण्या संदर्भात प्रातांधिकाºयांमार्फत शेतकºयांची चर्चा करण्यात आली. मात्र, यातुन शेतकºयांच्या हिताचा कुठलाही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सध्या रेल्वेच्या हद्दीतच तिसºया रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. यातील जळगाव ते शिरसोली दरम्यान बहुतांश काम पूर्ण झाले आहे.तोडगा काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकाºयांसोबत बैठकजमिनींचे भूसंपादन न झाल्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या पुढील कामाला विलंब होत आहे. या मार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास, रेल्वे मंत्रालयाकडून मंजुर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. भूसंपादनाबाबत तोडगा काढण्या संदर्भात गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
योग्य भाव मिळाल्यावरच जमिनी देण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:09 PM