एरंडोल : सोमवारी, ५ जून २१ रोजी एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होणारे नोंदणीकृत मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून एकच गणपती बसवावा, असे आवाहन केले त्याबाबत सविस्तर चर्चा होऊन सर्वांनी या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, नगराध्यक्ष देवीदास महाजन, विजय महाजन, रवींद्र महाजन, जगदीश ठाकूर शालिक गायकवाड, आर. डी. पाटील, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, नितीन चौधरी, असलम पिंजारी, अतुल महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, संजय महाजन, प्रमोद महाजन, प्रकाश चौधरी, सुनील मराठे, दशरथ चौधरी, परेश बिर्ला, कैलास महाजन, प्रा. नितीन पाटील, प्रा. सुधीर शिरसाट , राजधर महाजन, उमेश महाजन, गणेश महाजन, कुंदन ठाकूर, अखिल मुजावर, पंकज पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी केले, आभार प्रदर्शन संदीप सातपुते यांनी केले.