जळगाव : शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून खड्डयांमुळे त्रस्त झाले आहेत. सर्वच जळगावकर खड्डयांनी त्रस्त असताना शहरातील लोकप्रतिनिधींचा घराच्या परिसरातील रस्ते मात्र गुळगुळीत असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीत आढळून आले होते. ‘लोकमत’ ने शुक्रवारच्या अंकात हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर नागरिकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले जात आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या वाक्याचा वापर करून सत्तेत आलेल्यांनी ‘सबका साथ अन् खुदका विकास’ केल्याचे मत सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केले.
आमचं जळगाव ये फेसबूक पेजने देखील ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’बाबत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावर देखील जळगावकरांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्ते म्हणजे इस्त्राईलच्या मधुमेहाच्या औषधांसारखे असल्याचे एका नेटीजन्स सांगितले. तर मिलिंद देशपांडे या नेटीजन्सने जळगावचे दुदैवाचे फेरे कधी संपणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.आमच्या घरातील रस्ता पाहताना परदेशात गेल्यासारख वाटतमाजी नगरसेवक नितीन पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर त्यांच्या भागातील रस्त्याचा फोटो टाकून, हा रस्ता पाहिल्यानंतर परदेशात गेल्यासारख वाटत असे उपहासात्मक लिहले आहे. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी ही ‘सबका साथ अन् खुदका विकास’ या शब्दात सत्ताधाºयांवर टीका केली आहे. त्यांच्यासह अनेक व्हॉट्सअॅप ग्रृपवर देखील सत्ताधाºयांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनतेचा विचार न करणारे हे केवळ पुढारी होवू शकतात ते लोकांचे प्रतिनिधी होवूच शकत नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.