चाळीसगाव, जि.जळगाव : पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीत २०१५ ते २०२० दरम्यान बेकायदेशीर कर्ज वाटप व खोट्या नोंदी घेऊन शासनाची तब्बल ५१ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विकासोचे सचिव, चेअरमन आणि संचालकांसह १७ जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळवाड म्हाळसा येथील विविध कार्यकारी सोसायटीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून शासनाने दिलेल्या १७ डिसेंबर २०२० रोजी संस्थेचे लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. लेखापरीक्षक मंगेश आरशी वळवी (रा. जळगाव) यांनी केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी अपहार झाल्याचे आढळून आले.
वळवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वासुदेव भिका माळी, दिगंबर मोतीराम पाटील, कैलास सजन चौधरी, प्रकाश रामचंद्र
माळी, बेवाबाई सुपडू माळी, शेनफडू दोधा पाटील, संचालक एकनाथ सहादू पाटील, चिंतामण हरी अहिरे, दयाराम दगा माळी, लक्ष्मण जयराम माळी, सखाराम मोतीराम तिरमली, सुकदेव नारायण पाटील, शोभा रमेश पाटील (सर्व रा. पिंपळवाड म्हळसा), सचिव रामचंद्र बुवहन पाटील, (रा. उंबरखेड), आर.एल.वाघ, बी.पी. साळुंखे, डी.यु. पवार (तिघे रा. चाळीसगाव) या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेमंत शिंदे करीत आहेत.