ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.23 : प्रज्ञाचक्षू व्यक्तींनाही मोबाईल एसएमएस सहज वाचता येतील, अशी प्रणाली शहरातील गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी विकसीत केली आह़े अत्यल्प खर्चातील ही प्रणाली प्रज्ञाचक्षू बांधवांना मोठा दिलासा ठरणार आहे. तर स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा घेत कचरा व्यवस्थापनावरही प्रकल्प तयार करण्यात आला आह़े
दैनंदीन जीवनात मोबाईल हा अविभाज्य अंग ठरत असून त्यातील संदेश (एसएमएस) प्रणालीही तितकीच महत्वाची आहे मात्र अंध बांधवांना एसएमएस सहज तयार करता व वाचता यावे या दृष्टीने श्री गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थिनींनी अॅडव्हान्स एस.एम.एस ट्रान्समिशन अँड रेसिप्शन सिस्टिम फॉर ब्लाइंड पिपल हा प्रकल्प पुर्णत्वास आणला आहे. आत्तापयर्ंत ब्रेल लिपी केवळ प्रज्ञाचक्षू बांधवांसाठी उपयुक्त होती मात्र वरील प्रकल्पाद्वारे या लिपीचा उपयोग हा एस.एम.एस म्हणजेच (शॉर्ट मेसेज सर्विस) साठी सुद्धा शक्य आह़े प्रा़गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रता फालक, मयुरी कुलकर्णी, पुनम लोखंडे, तृप्ती चौधरी यांनी हा प्रकल्प साकारला़
स्वच्छतेबाबत मिळणार माहिती
स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा घेत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागाच्या पुष्पक पाठक, आदित्य जानकर, अविनाश तायडे, ऋषिकेश कलाल यांनी कच:याच्या पेटय़ा वा कुंडी भरल्यानंतर तातडीने नगरपालिका प्रशासनाला संदेश जाईल, असा प्रकल्प बनवला आह़े स्वच्छता व्यवस्थापन करण्यासाठी त्यामुळे मदत होणार आह़े भुसावळ तसेच परिसरातील इतर गावांसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरू शकतो, असे प्रा. दीपक खडसे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन विभागाचे डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केल़े