ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - जळगाव तालुक्यातील देऊळवाडा येथील राजू प्रभाकर सोनवणे (32) व तनुजा राजू सोनवणे (25) या पती-पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे नातेवाईकांची गर्दी झाली होती. ही घटना रविवारी देऊळवाडा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दोघांनी घरातच विष प्राशन केले. या वेळी राजू सोनवणे यांच्या आई-वडिलांसह तनुजा सोनवणे यांचेदेखील आई-वडील देऊळवाडा येथे आलेले होते. मात्र ते घराबाहेर होते. त्यावेळी राजू सोनवणे यांनी विष प्राशन केले. त्यांच्यापाठोपाठ तनुजानेदेखील विषप्राशन केले. हा प्रकार शेजारच्या महिलेच्या नजरेस पडला. त्यावेळी या महिलेने हा प्रकार इतरांना सांगितला व दोघांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांना कोसळले रडूजिल्हा रुग्णालयात दोघांचे नातेवाईक मोठय़ा संख्येने पोहचले. येथे महिलांना रडू कोसळले. हे सर्व जण आपत्कालीन कक्षासमोर थांबून होते.
अन्य दोघांनीही घेतले विषदुस:या घटनेत ईश्वर हिंमत बोराडे (35, रा. विटनेर, ता. जळगाव) व भगवान लक्ष्मण खैरनार (42, रा. कासोदा, ता. एरंडोल) यांनीही विषप्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवून उपचार करण्यात आले. एकाच वेळी विषप्राशन केलेले चार जण रुग्णालयात आल्याने एकच धावपळ उडाली होती.