जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या १४६ वर्षांची परंपरा असलेल्या वहनोत्सवास ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. वहन आपल्या दारी यावे अशी अपेक्षा भाविकांची असते. त्यानुसार पान-सुपारी घेऊन अनेक जण आता मंदिरात येत असल्याची माहिती संस्थानचे गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांनी दिली.ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या रथाचे खान्देशातील जनतेला उत्सुकता असते. यंदा रथोत्सव सोहळा १९ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीदिनी निघेल. त्यापूर्वी ८ नोव्हेंबरपासून वहनोत्सवास सुरुवात होईल. यंदा हा सोहळा १३ दिवस आहे. यंदा एक तिथी वाढल्याने श्री गजेंद्र मोक्षाचे वहन अतिरिक्त असेल.निमंत्रण देण्यासाठी अनेकांची गर्दीअनेक जण परंपरेप्रमाणे वहन आपल्याकडे यावे म्हणून निमंत्रण देत आहेत. दिवसाला पूर्वी एक किंवा दोन जणांकडे वहन जात असे. आता मात्र दिवसाला तीन तर काही वेळा चार ठिकाणी वहन जाते. त्यामुळे मंदिरापासून वहन निघण्याच्या वेळेतही बदल करावा लागला आहे. पूर्वी वहन रात्री ९.३० वाजता निघत असे. आता मात्र सायंकाळी ७ वाजता मंदिरापासून निघते. काही ठिकाणी रात्री १२ ते १ वाजतात तरी भाविक वहनाची प्रतिक्षा करत थांबून असतात असे गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.वहनोत्सवाची जय्यत तयारीवहनोत्सवास ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ८ ते १८ दरम्यान अनुक्रमे घोडा, हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, श्री सरस्वती, शेषनाग, गजेंद्र मोक्ष, चंद्र, सूर्यनारायण, गरूडराज, मारूतीराय असे वहन असेल. १९ रोजी रथोत्सव सोहळा तर २० रोजी रासक्रीडेचे वहन असेल.काय आहे पान सुपारी?वहन आपल्याकडे यावे अशी अनेकांची अपेक्षा असते. वहन दारी येणे म्हणजे अनेकांसाठी दिवाळीपेक्षा मोठा आनंद असतो. यासाठी संबंधीत यजमान सपत्नीक श्रीराम मंदिरात येतात. मंदिरात उत्सव मूर्तीसमोर पान व सुपारी ठेऊन आमंत्रण दिले जाते. तसेच विद्यमान गादीपतींनाही निमंत्रण दिले जाते. उत्सव मूर्तीसमोर पान सुपारी ठेवली जात असल्यामुळे या कार्यास पान-सुपारी असे नाव प्रचलीत झाले. वहन ज्याच्या घरी जाते तेथे भारूड, भजन, प्रसाद व वहनाची आरती असे कार्यक्रम होतात. त्यामुळे वहन सत्संग सोहळा प्रत्येक ठिकाणी होत असतो. े
जळगावात वहनोत्सवासाठी पानसुपारीसाठी भक्त सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:12 PM