धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरातील एका शेतात राखणदारीचे काम करणा:या 47 वर्षीय महिलेचा गळा आवळून अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आह़े अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आह़े बेबीबाई राजू गायकवाड (वय 47, रा़ अन्वर नाल्याजवळ, धुळे) असे मयत महिलेचे नाव आह़े त्या अशोक सखाराम ढिवरे (रा़ संत नरहरी कॉलनी, धुळे) यांच्या शेतातील झोपडीत राहून शेतात रखवालदारीचे काम करीत होत्या़ शनिवारी सकाळी 6़30 वाजेच्या सुमारास झोपडीपासून शंभर मीटरच्या अंतरावर बेबीबाई मृतावस्थेत आढळून आल्या़ प्राथमिक स्थितीवरून बेबीबाईचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ घटनास्थळी महिलेचे कपडे, चप्पल, गोधडी पडलेली आढळून आली आह़े बेबीबाई हिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा पती टेलरिंगचे काम करतो़ मात्र तोही तिच्यासोबत राहत नव्हता़ तिला तीन मुले व दोन मुली आहेत़ एक मुलगी तिच्याजवळ राहत होती, तर दुसरी शिरपूर येथे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़ रात्री उशिरार्पयत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आह़े
धुळ्यात महिलेचा गळा आवळून खून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 11:40 PM