धरणगाव, जि.जळगाव : येथील प्राचीन श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर दशलक्षण महापर्व अत्यंत उत्साहात पार पडाला. यानिमित्त रोज अभिषेक-पूजा यासोबतच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झाले.या पर्युषण सप्ताहात सोलापूर येथील सुरेखा नानजकर (सोलापूर) यांचे प्रवचन झाले. तसेच अक्षता शहा यांच्या भजनसंध्येने आबालवृद्ध मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्याची साथ पीयूष डहाळे यांनी दिली. यानिमित्ताने पाठशाळेच्या मुला-मुलींना तसेच महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अध्यापक पुनीत लाड व जैन उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक जैन यांनी परिश्रम घेतले.वर्षातून एकदाच होणाऱ्या चोवीस तीर्थनकारांची पूजेचा मान पुणे येथील सुधीर पंडित यांना, तर महाप्रसादाचा मान ठाणे येथील रजनी अळसपूरकर यांना मिळाला. या वेळी सुहास डहाळे (पुणे), नवनीत जैन (चंद्रपूर), मंगेश जैन (पुणे), अरुण जैन (कुसुम्बा), उदय डहाळे (मुंबई) उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, प्रतीक जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेयांश जैन, सावन जैन, उदय डहाळे, निकेत जैन, राजेश डहाळे,नितीन जैन, सुजित जैन, विनोद जैन, विवेक लाड, प्रफुल्ल जैन, नितीश जैन, सुप्रीत जैन, वेदांत लाड, आदित्य जैन, सौरभ डहाळे, स्वप्नील जैन तसेच राजूलमती महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
धरणगावला पर्युषण महापर्व व जलयात्रा महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:27 PM
प्राचीन श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर दशलक्षण महापर्व अत्यंत उत्साहात पार पडाला.
ठळक मुद्देअभिषेक-पूजेसोबतच समाज प्रबोधनाचे कार्यक्रमपाठशाळेतील मुले तसेच महिलांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम