ठळक मुद्दे१८ बटालियन एनसीसीतर्फे आयोजनसर्जिकल स्ट्राईकचे प्रात्यक्षिक पाहून पे्रक्षकांच्या अंगावर शहारेमहाविद्यालयाच्या प्रांगणाला छावणीचे स्वरूप
धरणगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी, महाविद्यालय, व पी. आर. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा पराक्रम पर्व दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे प्रात्यक्षिक सादर करुन प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. महाविद्यालयाच्या प्रांगणाला छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्ष सीमारेषा, दहशतवाद्यांचे अड्डे, सैन्यदल, कारवाईनंतरची अवस्था, प्रथमोपचार टीमचे कार्य, बॉम्ब गोळ्यांचा वर्षाव हे सर्व प्रत्यक्ष मैदानावर पाहून प्रेक्षक भारावून गेले होते.