शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धरणगावकरांना गूळ प्रकल्प तारणार

By admin | Published: April 10, 2017 12:45 AM

अंजनीचे पाणी आटले : तापीचे पाणी संपण्याच्या मार्गावर, धावडा डोहाचे पाणी या महिन्यापुरतेच

धरणगाव : शहराला पाणीपुरवठा करणा:या अंजनी नदीचे पाणी संपल्याने सध्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी शहराला मिळत आहे. हे पाणीही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आता शहराला गूळ प्रकल्पाचे पाणी  तारणार आहे. असे असले तरी धरणगावासीयांच्या मनात आतापासूनच धाकधूक निर्माण झाली आहे.पाणी असो वा नसो, बाराही महिने बारा दिवसाआड पाणी शहरवासीयांच्या नशिबी आहे. त्यातल्या त्यात मार्च, एप्रिल, मे आाणि जून हे चार महिने शहराला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे होते. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यार्पयत धावडा डोहात पाणी राहील, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र मे व जून महिन्यासाठी गूळ प्रकल्पाचे पाणी शहराला तारणार असल्याचे चित्र आहे.150 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षितगूळ प्रकल्प हा चोपडा व धरणगाव तालुक्याचा तारणहार मानला जातो. याच प्रकल्पातून   दोन्ही तालुक्याची तहान भागविली जाते. धरणगाव शहरासाठी गेल्या वर्षी या प्रकल्पातून तीन आवर्तन मिळाले होते. या वर्षासाठीही या प्रकल्पातून 150 दशलक्ष घनफूट पाणी जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवले आहे. त्यामुळे आता महिनाअखेर्पयत या प्रकल्पातून पाणी सोडण्याची गरज भासेल असा अंदाज आहे.पालिका प्रशासनाचे आवाहनशहराला ज्या तापी पात्राच्या धावडा डोहातून पाणी पुरवले जाते त्या पात्रातील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सुरेखा विजय महाजन, मुख्याधिकारी सपना वसावा यांनी पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. पाणी संपण्याच्या मार्गावर असल्याने शहरात रिक्षा  फिरवूृन पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.आवर्तनाची मागणी करणारया महिनाअखेर्पयत धावडा डोहाचे पाणी संपण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे येत्या 15 ते 20 एप्रिलदरम्यान जिल्हाधिका:यांकडे शहरासाठी राखीव कोटय़ातून  आवर्तन सोडण्याची मागणी   पालिका प्रशासन करणार आहे. यावर्षी दोन आवर्तन लागतील        की तीन हे आज सांगणे कठीण झाले आहे.  नेते असतानाही समस्या धरणगाव शहरात आधीच 12 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही पालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. दर 12 दिवसाआड होणा:या पाणीपुरवठय़ामुळे पाणी कसे पुरवावे ही समस्या भेडसावत असताना आणखी पाणी कसे काटकसरीने वापरावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वास्तविक सर्व पक्षांचे जिल्हा नेते धरणगाव शहरात आहेत. असे असताना पाणी प्रश्न सोडविला जाऊ नये, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.धरणगाव शहराला पाण्याची कमतरता भासू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे आमचे नियोजन सुरू आहे. तापी पात्रातील पाणी संपले तरी गूळ प्रकल्पाचे पाणी शहरासाठी आरक्षित केले आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी यासाठी आम्ही आवाहन केले आहे.     -सलीम पटेल, नगराध्यक्ष, धरणगाव