धार, ता.अमळनेर /चोपडा : अजमेर येथून दर्शन घेऊन गावाकडे येत असताना कारला अपघात झाला. यात अमळनेर तालुक्यातील धार येथील पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मुंबई-दिल्ली महामार्गावर भिलवाडा (राजस्थान) बायपासजवळ घडली.चोपडा येथील रईसबेग मिङरा, सुल्तानबी मिङरा, जामिलाबी मिङरा (सर्व रा. चुनारअळी), राजू सैयद (आझाद चौक) यांच्यासह धार येथील अब्दुल मकसुद अ.सईद मुजावर (39) हे चोपडा येथून कारने (क्र.एमएच 04-ईएच 6380) सोमवारी अजमेर येथील दग्र्यावर दर्शनासाठी गेले होते. अजमेरहून गावाकडे परत येत असताना गुरूवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास भिलवाडा बायपासजवळ कारला अपघात झाला. या अपघातात धार येथील अ.मकसुद मुजावर व त्यांचा मुलगा रिहान मुजावर (10) हे जागीच ठार झाल, तर गाडीतील एक जण जखमी झाला. दरम्यान, कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. शुक्रवारी दोघा पिता-पुत्राच्या शवाचे विच्छेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरार्पयत धार येथे आणण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजताच धार गावात शोककळा पसरली होती. अब्दुल मुजावर यांच्या पश्चात आई, वडील, प}ी, मुलगा असा परिवार आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या अपघातात धार येथील पिता-पुत्र ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 1:02 AM