शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

धुळे भाजपामध्ये आता निकराची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:48 PM

धुळे जिल्ह्यात भाजपामध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळस गाठला आहे. आक्रमक नेते अनिल गोटे यांच्या विरोधाला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे सोपविल्याने निकराची लढाई सुरू झाली आहे.

मिलींद कुलकर्णीधुळ्यातील राजकारण गुंतागुंतीचे आणि संभ्रमित करणारे राहिले आहे. काँग्रेसच्या भरभराटीच्या काळात रोहिदास पाटील, द.वा.पाटील, अमरीशभाई पटेल, रामराव पाटील या दिग्गज नेत्यांचा दबदबा होता. राज्य मंत्रिमंडळात किमान एक तरी मंत्री हमखास असायचा. पक्षांतर्गत मतभेद होतो. जवाहर आणि अँकर गट प्रसिध्द होते. या गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. एकदा जिल्हा परिषद हातातून गेली तर एकदा महापौरपद गेले. आधी लोकसभा, नंतर विधानसभेच्या जागा घटल्या. अलिकडे धुळे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाने हिसकावले. गटबाजीचा हा परिणाम दोन्ही काँग्रेसने भोगला आहे. विरोधी पक्ष बनल्यावर दोघांना त्याची जाणीव झाल्याने जिल्हा बँकेची निवडणूक असो की, आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक असो, दोन्ही पक्ष सामंजस्य व सामोपचाराची भाषा करीत आहे.याउलट चित्र भाजपामध्ये आहे. भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने आणि दोन्ही ठिकाणची मंत्रिपदे धुळे जिल्ह्याला मिळाली असल्याने नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच हवेत आहेत. त्यांच्या हवेला टाचणी लावण्याचे काम स्वकीय आमदार अनिल गोटे यांनी चालविले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत गोटे यांनी उभा दावा मांडला आहे. धुळ्यातील विकास कामांमध्ये दोन्ही मंत्री आडकाठी आणत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासारख्या योजनांवरुन गोटे हे मंत्र्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने भामरे-रावल नाराज होते. पांझरा चौपाटीचे अतिक्रमण काढणे, पांझरेच्या दोन्ही तिरावर रस्ते बांधणे, रस्ते कामात अडथळा ठरणाऱ्या मंदिरांचे अतिक्रमण हटविणे या विषयावरून आमदार आणि मंत्रिगटातील वाद विकोपाला गेला. मंत्री हे मुख्यमंत्री, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना कार्यक्रमाला बोलावित तर गोटे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करीत असत. पण या दौºयांमध्ये गटबाजीचे दर्शन घडत असे.पत्रकार, शेतकरी नेते, बेरोजगारांचे नेते अशा भूमिकेतून राजकारणात स्थिरावलेल्या अनिल गोटे यांनी १५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात चढउतार पाहिले. तेलगी प्रकरणात कारागृहात जाऊन आलेल्या गोटे यांनी धुळ्यावरील पकड मात्र भक्कम ठेवली. पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले. शिवतीर्थ, पांझरा चौपाटी, रस्ते, भाजीमार्केट अशा विकास कामांसोबत अतिक्रमण हटाव मोहीम ही गोटे यांची बलस्थाने आहेत. मंत्रालयापासून तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत संचार असलेल्या गोटे यांनी राजकारणाची नाडी अचूक ओळखली आहे. विरोधकांच्या कारवायांचा सुगावा त्यांना सर्वात आधी लागतो. त्यामुळे विरोधक उघडपणे त्यांच्या वाटेला जात नाही. अलिकडे भामरे आणि राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे यांनी गोटे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.दोन्ही मंत्र्यांचा मानसन्मान राखला जात नसल्याने पक्षश्रेष्ठी गोटे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. लोकसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून गोटे यांचे कार्य सुरू होते, याकडे पक्षश्रेष्ठी कानाडोळा करू शकत नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत वाद हाताळण्याचे कौशल्य लाभलेल्या गिरीश महाजन या मुख्यमंत्र्यांच्या जवळील मंत्र्याला धुळ्याची जबाबदारी देण्यात आली. अधिकृत घोषणा आता झाली असली तरी महिनाभर आधीच महाजन सक्रीय झालेले आहेत. दोनदा ते धुळ्यात येऊन गेले तर एकदा भामरे यांनी जळगावात त्यांच्यासोबत गुप्तगू केले. महाजनांच्या नियुक्तीला गोटे विरोध करतील, ही पक्षश्रेष्ठींची अपेक्षा खरी ठरली. आता गोटे काय भूमिका घेतात याविषयी पक्षश्रेष्ठींपासून तर सामान्य जनतेपर्यंत उत्सुकता राहणार आहे.महापालिकेत सध्या सत्ता राष्टÑवादी काँग्रेसची आहे. दोन्ही कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणुका लढवतात काय हा प्रश्न महत्वाचा राहील. शिवसेना हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु या पक्षालाही गटबाजीने ग्रासले आहे. भाजपाची सगळी मदार ही इतर पक्षांमधील नाराज मातब्बरांवर राहणार आहे. जळगावची पुनरावृत्ती करण्याचा महाजन यांचा प्रयत्न राहणार आहे.खान्देशातील जळगाव आणि धुळे या दोन मुख्यालयांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून सत्ताधारी भाजपामध्ये नवे समीकरण, भविष्यातील पक्षाच्या वाटचालीची दिशा निश्चित होत आहे. जळगावात खडसे तर धुळ्यात गोटे यांना पक्षाने दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेसाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ नीती वापरण्यास भाजपा आता कचरत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जळगावपाठोपाठ धुळ्यातही ‘आयारामां’ची फौज पक्षात सामील झाली तर आश्चर्य वाटायला नको.धुळ्यातील भाजपामध्ये ‘परका-निष्ठावंत’ असा वाद सुरू आहे. निष्ठावंत कार्यकर्ते दोन्ही गटात विभागले गेले आहेत. एकमेकांना ‘परका’म्हणण्याची स्पर्धा लागली आहे. विशेष म्हणजे तिन्ही नेते मूळ भाजपाचे नाहीच. गोटे यापूर्वी दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. डॉ.भामरे हे शिवसेनेतून भाजपामध्ये आले. तर रावल यांनी पहिली निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली होती. भामरे आणि रावल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची आहे. गोटे हे शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी या मार्गे आले आहेत.गोटे विरोधकांचे ऐक्यजळगावात ज्याप्रमाणे खडसे नको, महाजन चालतील, अशी सर्वपक्षीयांची भूमिका होती, त्याप्रमाणे धुळ्यातील स्थिती आहे. अनिल गोटे नकोत, या समान भूमिकेवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झालेले दिसते. खडसे यांनी जिल्हा बँक, दूध संघाच्या माध्यमातून सर्वपक्षीयांना जवळ केले असले तरी गोटे यांनी सगळ्यांना अंगावर घेतले आहे. हा मोठा फरक आहे. त्यामुळे उघडपणे नसले तरी गोटेविरोधकांचे अंतर्गत ऐक्य राहू शकते.

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण