जळगाव : धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून अभाविपच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.तीस टक्के शुल्क माफी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी अभाविपने कार्यकर्त्यांनी बुधवारी धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांचा ताफा अडविला होता़ विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला़ यात काही विद्यार्थी जखमी झाले़सत्तार यांनी राजीनामाद्यावा आणि मारहाण करणाºया पोलिसाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली़गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपचे कार्यकर्ते एकत्र आले होते़ यावेळी पोलिसांचा ताफा मोठ्या संख्येने उपस्थित होता़ सर्वात आधी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर थांबवून घटनेचा निषेध नोंदविला आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली़ त्यासोबतच ज्या पोलिसाने विद्यार्थ्यावर बुक्कयाचा मारा केला़ त्या पोलिसाला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली़ यावेळी अभाविपचे महानगरमंत्री रितेश चौधरी, पवन भोई, आदेश पाटील, मयूर अलकरी, शिवाजी भावसार, पूर्वा वैष्णव, रिध्दी वाडीकर, विलास पाटील, पराग मुसळे, जयेश पाटील, पवन भोळे, मनोज जंजाळ आदी उपस्थित होते़अशा आहेत मागण्या_ कोरोनाच्या महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत़ परंतु, विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे,._ सन २०२०-२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० टक््के कपात करण्यात यावी._ सरासरीच्या सुत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनमूर्ल्यांकन करण्यात यावे._ नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त पंधरा टक्के शुल्क घेवून प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत़
धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:12 PM