केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य द्या
जळगाव : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगरच्या वतीने करण्यात आली. याविषयी अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
पथदिवे बंद
जळगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर शहरातील विविध भागातील पथदिवे बंद असून ते अजूनही सुरू झालेले नाही. यात प्रभात चौक ते मू.जे. महाविद्यालय व पुढे गिरणा टाकी थेट वाघ नगर पर्यंत पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांची कसरत
जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था होण्यासह आता अनेक भागात रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. त्यात शनिवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली असताना बाजारपेठेतून बाहेर पडताना वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचर्यावरून वाहने द्यावे लागली.
शासकीय योजनांची माहिती घेण्यास अडथळा आणणाऱ्या कर्मचार्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात शासकीय शिधापत्रिका तसेच आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटू न देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याविषयी पक्षाचे जळगाव शहर युवा अध्यक्ष नीलेश बोरा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बोरा व अनिल सोनवणे हे दोघेजण २६ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अधिका-यांना भेटण्यासाठी गेले असता तेथील महिला कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हे कार्यालयात असतानाही त्यांना भेटू दिले नाही. उर्मटपणे बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.