दुर्गादासगिरी गोसावी, भाऊ कालिदास व अंबादास या तिघांनी बहीण नारायणी गोसावी हिच्या लग्नासाठी स्वत:चे लग्न केलेले नाही. आधी बहिणीचे लग्न धूमधडाक्यात करायचे व नंतर आपले लग्न करू, असा निर्धार या भावंडांनी केला होता. पाचोरा येथील सिंधी कॉलनीत ते वास्तव्याला होते. रोज ते बस किंवा रेल्वेने अपडाऊन करायचे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, परिविक्षाधीन उपअधीक्षक नितीन गणापुरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व सहकारी वकील मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली.
आक्रोश करणाऱ्या नातेवाइकांना या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धीर दिला.
धडक देणाऱ्या वाहनाचा शोध
गोसावी व पाटील यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून वाहनासह पलायन केले असून, आता त्याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. प्राची सुरतवाला यांनी शवविच्छेदन केले असून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी करीत आहेत.
महामार्गावर तिसरा बळी
शहरातून जाणारा महामार्ग दिवसेंदिवस जीवघेणा ठरत चालला असून, महिनाभराच्या आत हा तिसरा बळी आहे. १७ जानेवारी रोजी अजिंठा चौकापासून काही अंतरावर मित्राच्या पत्नीला घ्यायला जात असलेल्या समाधान श्रीराम चंदन (३१, रा. कासरखेडा, पो. अंकाई, ता. येवला) या तरुणाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला होता, तर धवल अंबादास बच्छाव (२८, रा. गुजरखेडा, ता. येवला) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याआधी २४ डिसेंबर रोजी मीना किशोर तळेले (५३, रा. प्रभात कॉलनी) या महिलेलाही मागून आलेल्या ट्रकने चिरडले होते. खराब रस्त्यामुळे तोल जाऊन त्या दुचाकीवरून पडल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच भुयारी मार्गासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोनल करून महामार्ग रोखला होता. त्यातच ही घटना घडली.