उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात सापडलेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली पाहताना दिसत आहे.पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायासाठी शेतकरी सातत्याने पाण्याच्या शोधात राहिला आहे .परंतु गेली तीन -चार वर्षे पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतच पाणी राहिले नाही. तरीही शेतकरी पाण्याच्या शोधात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र त्याचा सगळेच गैरफायदा घेत असल्याने बुडत्या शेतकºयांचा पाय अधिकच अडचणीत जाताना दिसत आहे.शेतकरी पाण्याच्या शोधात असल्याचे पाहून उत्तर प्रदेशातील अनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन डिसेंबरमध्येच दाखल झाले आहेत. या यंत्राच्या एक फुट खोदाईस १२५ ते १५० रुपये मोजावे लागतात. या भागातील पाण्याची पातळी २०० फुटापेक्षा जादा खोल असली व ही खोदाई एवढी महागडी असली तरीही शेतकरी लाखो रुपये खर्चून नशिबाची परीक्षा घेताना दिसत आहेत. या बोअरमध्ये शेतकºयास पाणी मिळो न मिळो, त्यांची संपूर्ण रक्कम मोजावीच लागते. विशेष म्हणजे या व्यवहारात कसलीही सूट मिळत नाही. विहिरीच्या भिंतीत आडवे बोअर घेण्याचाही प्रयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.नवीन विहीर खोदणे तर सर्वसामान्य शेतकºयांच्या आवाक्याबाहेर होऊन बसले आहे. या कामासाठी मजुरांना ३५० ते ४०० रुपये मंजुरी द्यावी लागत आहे, तर विहिरीतील खोदलेले दगड बाहेर काढणाºया बैलजोडीला दररोज किमान ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकºयांच्या या परिस्थितीत जमिनीतील पाण्याचा वर अंदाज देणारे (पानाडी) नारळाचा आधार घेतात, तर कोणी रक्तगटाच्या आधारे जमिनीतील पाण्याचा अंदाज वर्तवीत आहेत. शेतकरी जमिनीत पाणी नसताना देवाला नवस (साकडे) घालूून भूगर्भातील पाण्याची खोली शोधत आहेत.
रावेर तालुक्यातील उटखेडासह परिसरात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 4:15 PM
उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात ...
ठळक मुद्देकेळी बागा वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपडउत्पादन खर्चही निघणे झाले अवघडअनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन दाखल