जळगाव : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तसेच गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेले जिल्ह्यातील ३९३ स्वातंत्र्य सैनिक असून त्यापैकी १४७ जणांना केंद्र शासन तर २४६ जणांना राज्य शासनाकडून दरमहा मानधन दिले जात आहे. केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मानधनात १५ हजाराची तफावत आहे, ती दूर करणे आवश्यक आहे.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात व गोवा मुक्ती संग्रामातही जळगाव जिल्ह्यात मोठा सहभाग होता. या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेल्यांची केंद्र व राज्य शासनाकडे नोंद आहे. केंद्र शासनाकडे नोंद असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाकडून दरमहा २५ हजार रूपये मानधन दिले जाते. ते केंद्र शासनाकडून थेट बँकेमार्फत खात्यात जमा होते. त्यातील राज्यातील रहिवासी असलेल्यांना राज्य शासनाकडूनही ५०० रूपये दरमहा मानधन दिले जाते. केंद्र शासनाकडे नोंद असलेले १४७ स्वातंत्र्य सैनिक आहेत. तर राज्य शासनाकडे नोंद असलेले २४६ स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांना राज्य शासनाकडून १० हजार रूपये मानधन दिले जाते.मानधनात फरककेंद्र शासनाकडे नोंद असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा २५ हजार रूपये तर राज्य शासनाकडे नोंद असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जात आहे. हा फरक मिटविण्याची आवश्यकता आहे.स्वतंत्र आकडेवारी नाहीस्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक किती आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेले स्वातंत्र्यसैनिक किती? याची आकडेवारीच जिल्हाप्रशासनाकडे उपलब्ध नाही. तहसीलदार स्तरावरून ती माहिती मागविण्यात आली आहे. मात्र अद्यापही ती प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात आले.