जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याने मिळेल त्या जागेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे़ शिवाय अंत्यंसस्कारासाठी स्मशानभूमित येऊन आधीच माहिती देऊन जागा राखीव करावी लागत असल्याचेही धक्कादायक चित्र काही दिवसांपासून आहे़ रविवारी एकाच दिवशी १२ जणांच्या मृत्यूची नोंद होती़मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका नागरिकाला गंभीर न्यूमोनियाची लागण झाली होती़ त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला मात्र, प्रकृती गंभीर असल्याने रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबिय नेरी नाका स्मशानभूमित गेले असता़ येथील सर्व ओटे फुल्ल होते़ मोठा प्रश्न निर्माण झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी मग जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले असता, दोन मृतदेहांच्या मधोमध असलेल्या जागेत अंत्यंस्कार करण्यात आले़ हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचे बोलले जात आहे़गेल्या आठवडाभरापसून नियमित सात ते आठ मृतदेह स्मशानभूमित येत असल्याची माहिती समोर आली आहे़ रविवारी बारा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अडचणी अधिक वाढलेल्या होत्या़ शहरातील अन्य भागातील मृतदेही नेरी नाका येथेच येत असल्याने हा प्रकार होत असल्याचेही सांगितले जात आहे़ दरम्यान, अशा अडचणी असल्यामुळे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होण्याची मागणी समोर येत आहे़कोरोनाने होणारे मृत्यू चिंताजनकजिल्ह्यात बाधित रुग्णांचा मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे़ सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला़ रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, रविवारी आणखी एका संशयिताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़ गेल्या तीन दिवसात सात बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ जवळपास सर्वांना विविध व्याधी व प्रतिकारक क्षमता अत्यंत कमी असल्याने त्यांना बाधा झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला व सर्वांचे वय ६० व त्यापेक्षा अधिक होते, असे सांगण्यात आले आहे़कपड्यांमुळे भितीस्मशानभूमिच्या बाहेर काही कपडे व ग्लोज असे साहित्य फेकलेले आढळत असल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भिती व्यक्त करण्यात यत आहे़ मृतदेह आणल्यानंतर काही नातेवाईक कपडे बाहेरच टाकून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे़
जागे अभावी अत्यसंस्काराला अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:40 PM