शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

डिगंबर महाराज पायी वारीची 35 व्या वर्षाकडे वाटचाल

By admin | Published: June 11, 2017 3:43 PM

रावेर - यावल तालुक्यातील हरीभक्तांची वारीत फुलते मांदियाळी

 पाहावा विठ्ठल..बोलावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..अशी विठ्ठलमय आत्मानुभूती होणा:या हरिभक्त वैष्णवांचा मेळा चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य हभप दिगंबर महाराज यांनी त्यांच्या हयातीत  तालुक्यातील खानापूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरला जाणा:या पायी दिंडी वारीची रोवलेली पताका अमृतमहोत्सवी वर्षाकडे त्रिभुवनी फडकत आहे. 

श्री दिगंबर महाराज यांच्या वृध्दापकाळात खंडित झालेल्या या अमृतमहोत्सवी पायी वारीची पताका गत 35 वर्षांपासून त्यांचे अनुयायी हभप अरूण महाराज बोरखेडेकर यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली  व दिंडीचालक हभप भगवंत महाराज (खानापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीरसातून परमानंदाची आत्मानुभूती देणा:या या पायी वारीची अव्याहत परंपरा कायम राखली आहे. 
 यावल व रावेर तालुक्यातील हरीभक्तांना वारीतून   नेणा:या या  वारीला चिनावल येथील वै.हभप दिगंबर महाराज यांच्या निष्ठावंत अखंडित पायी वारीचे अधिष्ठान लाभले आहे. दिगंबर महाराजांनी त्यांच्या  हयातीत 35 ते 40 वर्षे  वारी  भक्तीची परंपरा चालवली होती . मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील खानापूर येथून या पायी दिंडी वारीचे हभप दिगंबर महाराज वारकरी संस्थांनच्या ध्वजपताकेखाली गत 34 वर्षांपासून प्रस्थान होत आहे.   600 कि.मी. अंतरावर 23 मुक्कामातुन  रोज 25 कि.मी. पायी अंतर कापत भावभक्तित तल्लीन होवून वाटचाल सुरू असते. खानापूरहून ज्येष्ठ शुध्द दशमीला या पायी दिंडी वारीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम चिनावल येथे श्री दिगंबर महाराजांच्या पुण्यभुमीत घेत ज्येष्ठ शु एकादशीला प्रस्थान होत असते. हंबर्डी, खडका, जामनेर, भारूडखेडा, गोळेगाव, सिल्लोड, भोकरदन, केदारखेडा, पांगरी, जालना, अंबड, शहागड, पाडळसिंगी, बीड, उदंडवडगाव, पारगाव, भूम, कोरेगाव, बार्शी, वडशिंगे, उपळाई व आष्टीचा शेवटचा मुक्काम घेवून आषाढ शु.चतुर्थीला हा पायी दिंडी सोहळा चंद्रभागेच्या तिरी नव्या सोलापूर रोडवरील श्री दिगंबर महाराज वारकरी संस्थांनतर्फे सुमारे चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या भव्य वारकरी निवासात विसावतो.
 गायन-वादन कला संस्कृतीत नैपुण्य मिळवलेली तरूणाई कपाळी चंदनाचा   टिळा लावून गळ्यात टाळ मृदंग व वीणा घेवून या दिंडीत सामील होत असल्याने या दिंडीला तारुण्य प्राप्त झाले आहे. संजीव महाराज (विटवे), अमोल भंजाले (रावेर), गोकुळ महाराज (विटवे), गोलू महाराज (पुनखेडा), उमेश  महाराज (रसलपूर)  किरण पाटील (धामणदे), अंबादास महाराज (मुक्ताईनगर), अप्पा महाराज (खानापूर) या तरूण  टाळकरी, मृदंगाचार्य व  गायकांसह   150 ते 200  वारक:यांचा समावेश असतो .
टाळ मृदंगाच्या गजरात  रोज   दरमजल सुमारे 25 कि.मी.अंतर भगवंताच्या नामस्मरणात प्राप्त होणा:या परमानंदातून पायी तुडवत पंढरपूरकडे वाटचाल करणा:या या दिंडीत रावेरसह यावल, ब:हाणपूर तालुक्यातील हरीभक्तांची मांदियाळी फुलत असते. श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी वारीचे आगमन होताच वै.हभप डिगंबर महाराज वारकरी प्रशिक्षण संस्थेतील वारकरी व भजनी मंडळ चंद्रभागेच्या तीरावर स्वागतासाठी येतात. पायी दिंडी वारीतील वारक:यांची गळाभेट झाल्यानंतर दिंडी सोहळ्याने त्यांना वारकरी निवासात आणले जाते.