ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 6 - डिजिटल शाळा योजनेला सुरुवातीला अल्प प्रतिसाद होता़ नंतर गावागावात प्रेरणा सभा घेऊन जनजागृती केल्याने लोकांचाही प्रतिसाद लाभत गेला़ हर्षल विभांडिक आणि देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनचीही मदत मिळाली. सर्व 1 हजार 160 जि.प. शाळा डिजिटल झाल्या. धुळे पॅटर्न अशी राज्यात ओळख निर्माण झाली आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली़‘लोकमत’च्या धुळे जिल्हा कार्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर मनमोकळा संवादही साधला़सर्व शाळा डिजिटलजिल्ह्यात 1 हजार 106 शाळा आहेत़ साक्री तालुक्यातील इंदवे आणि डवणेपाडा या दोन शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यानंतर या मोहिमेसाठी जिल्ह्यातील शंभर शाळांची निवड करण्यात आली. पण जसजशी डिजिटल शाळांची संख्या वाढत गेली, तशी जिल्ह्यातील सर्व गावांतूनही मागणी वाढली. जिल्ह्यातील डिजिटल शाळांची पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार हेसुद्धा येऊन गेले. विदेशात नोकरीला असलेले धुळ्याचे सुपुत्र हर्षल विभांडिक यांनी यासाठी आपला अमूल्य वेळ आणि आर्थिक मदत दिली. यामुळे आता ते ब्रॅण्ड अॅम्बॅसडर ठरले आह़े त्यांनी आतार्पयत राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांना भेटी देऊन डिजिटल शाळेच्या धुळे पॅटर्नची माहिती तेथील शिक्षक व नागरिकांना करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. लोकसहभागातून डिजिटल शाळा जिल्ह्यात लोकसहभागातून ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आपले योगदान दिल़े डिजिटल शाळा करण्यासाठी सुरुवातीला दीड लाख रुपये खर्च येत होता. हा निधी उभा करण्यासाठी असलेले धुळ्याचे सुपुत्र हर्षल विभांडिक यांनी या अभिनव योजनेत सुरुवातीला निवडलेल्या शाळांसाठी 75 टक्के निधी उपलब्ध करून दिला. परंतु जिल्ह्यातून वाढती मागणी पाहता यात हर्षल विभांडिक यांच्यासह देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशन यांनीही मदतीचा हात दिला. दीड लाखांपैकी 75 टक्के निधी लोकसहभागातून, तर उर्वरित निधी हा विभांडिक व मंजू गुप्ता फाउंडेशनने उपलब्ध करून दिला. आतार्पयत जिल्ह्यातील शाळांसाठी 7 कोटी 28 लाखांचा खर्च झाला असल्याचे देशमुख म्हणाले. सुरुवातीला डिजिटल शाळेसाठी दीड लाख खर्च होता. परंतु नंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कंपन्यांशी वाटाघाटी करून ती रक्कम कमी केली. आता डिजिटल शाळा करण्यासाठी एक लाखाच्या आत खर्च येतो, असाही उल्लेख त्यांनी केला. सर्वांगीण विकासास मदत डिजिटल शाळा केल्याने मुलांचा सर्वागीण विकास होण्यास मदत मिळत आह़े हसत-खेळत मुलांचा अभ्यास होत आह़े या प्रणालीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथ्र्याची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत आह़े उपस्थितीतसुद्धा फरक पडला आहे. गावातील इंग्रजी माध्यमातील शाळेचे विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेत प्रवेश घेत आहेत. वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्याथ्र्याची संख्या 715 ने वाढली आहे. डिजिटल शाळेसाठी स्वतंत्र कार्यशाळा घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 750 तंत्रस्नेही शिक्षक तयार केले आहे. या शिक्षकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेक्नो टिचर नावाची वेबसाइटही तयार केली आहे. त्यावर डिजिटल शाळेसंदर्भातील माहिती उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी सांगितले. स्मार्ट ग्राम महत्त्वपूर्ण योजनागावाच्या सर्वागीण विकासासंदर्भात स्मार्ट ग्राम ही महत्त्वपूर्ण योजना आह़े प्रत्येक तालुक्यातून एका गावाची आणि जिल्ह्यातून एका गावाची निवड करण्यात येत असत़े जिल्ह्यातून येणा:या गावाला 40 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आह़े यासाठी धुळे तालुक्यातील मळाणे आणि साक्री तालुक्यातील मलांजन या गावांची गुणानुक्रमे बरोबरी होती़ त्यामुळे हे बक्षीस दोन्ही ग्रामपंचायतींना विभागून देण्यात येणार आह़े हा विषय पालकमंत्री यांच्यार्पयत गेला आह़े या ग्रामपंचायतींची पुन्हा फेरतपासणी करण्यात येणार आह़े झोपडीतील शाळा वृत्तमालिकेबाबत ‘लोकमत’चे आभारशिरपूर तालुक्यातील अनेर डॅम या अभयारण्य भागात झोपडय़ांमध्ये शाळा भरत आह़े या ठिकाणी इमारती नसल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत ‘लोकमत’ वृत्तपत्रातून मालिका देण्यात आली. या मालिकेची दखल राज्यपाल भवन प्रशासनाकडून घेण्यात आली़ अभयारण्य असल्यामुळे इमारत बांधकामाला अडचणी येत असल्याचा मुद्दा शासनापुढे मांडण्यात आला़ वनविभागाकडे याबाबतचा प्रस्ताव सुरुवातीला नाशिक आणि नंतर नागपूरकडे पाठविण्यात आला आह़े राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आह़े लवकरच मुलांसाठी इमारत बांधण्याला परवानगी मिळणार आह़े यासाठी ‘लोकमत’चे आभार देशमुख यांनी मानल़े
डिजिटल शाळांचा ‘धुळे पॅटर्न’ आता राज्यात - ओमप्रकाश देशमुख
By admin | Published: May 06, 2017 4:19 PM