ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - तालुक्यातील पाथरी येथील वृंदा सुनील पाटील यांच्या खून प्रकरणी मयताचे दीर संजय शिवराम पाटील याला सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.20 ऑगस्ट 2015 रोजी आरोपीने सकाळी 6 ते 6.15 वाजेच्या दरम्यान वृंदा पाटील यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारले होते. त्यानंतर पोलीस पाटील संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.या प्रकरणी न्यायालयात एकूण 10 साक्षीदार तपासले व गुरुवारी या प्रकरणाचा निकाल लागला. यामध्ये आरोपी संजय शिवराम पाटील याला भादंवि कलम 302 नुसार जन्मठेपेसह 10 हजार रुपये दंड, दंडाची रक्कम जमा न केल्यास 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपी तर्फे अॅड. सत्यजित पाटील यांनी काम पाहिले.