लोकमत विशेष
धडगाव/मोलगी,दि.9- सातपुडय़ाच्या दुर्गम भागात विशिष्ट चवीसाठी पसंती दिल्या जाणा:या कै:यांचा हंगाम सुरू झाला आह़े याबरोबरच आमसूल तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. यासाठी व्यापारी सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील मोलगी आणि धडगाव परिसरात फिरून आदिवासी बांधवांसोबत संपर्क करत आह़े दुर्गम भागाच्या अर्थकारणाला दिशा देणारा हा हंगाम येत्या दीड महिने सुरू राहणार आह़े
सातपुडय़ाच्या दुर्गम भागात गेल्या 25 वर्षात वेगाने वाढीस लागलेल्या या व्यवसायातून आदिवासी बांधवांची आर्थिक विवंचना काही अंशी कमी झाली आह़े मात्र 25 वर्षात महागाई वाढूनही आमसूलाची होणारी खरेदी ही मातीमोल दराने असल्याने यंदा तरी आमसूलाला हमीभाव देण्याची मागणी आह़े (वार्ताहर)
आठ दिवसात 15 ट्रक रवाना
दुर्गम भागातील दगडयुक्त जमिनीत अल्पशा प्रमाणात येणा:या धान्य उत्पादनासोबत कुटुंबांचे पालनपोषण अधिक चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षात आमसूल उत्पादनाला चालना मिळाली आह़े पारंपरिक मोह, चारोळी आणि आमसूल या तीन उत्पादनांवर आदिवासी बांधवांचे वार्षिक गणित अवलंबून असत़े यंदा आमसूल उत्पादनाला सुरुवात झाली आह़े वनक्षेत्रात आणि शेतशिवारात लावलेल्या आंब्याच्या झाडांवरील कै:या तोडून त्यापासून आमसूल तयार करणा:या महिला आणि पुरुष घरोघरी दिसून येत आहेत़
उत्तर भारतात पाठवल्या जाणा:या या आमसुलापासून औषधी, शीतपेय, खाद्यपदार्थ, अॅसीड आणि खाद्यरंग बनवण्याचे उद्योग सुरू आहेत़ कच्च्या मालाच्या स्वरूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या आमसुलाची खरेदी मोठय़ा प्रमाणात सुरू आह़े यंदा केवळ पहिल्या एका आठवडय़ात मोलगी बाजारपेठेतून 15 ट्रक माल हा मध्यप्रदेशातील इंदौर, ग्वालियर, झांसी, राजस्थानातील जयपूर, दिल्ली या ठिकाणी पाठवण्यात आला आह़े व्यापा:यांनी मोलगी येथे येऊन या मालाची खरेदी केली आह़े यातील उत्तम दर्जाच्या मालाला साधारण 200 रुपये प्रतिकिलोर्पयत दर देण्यात आल्याची माहिती आह़े येत्या दीड महिन्यात शेकडो क्विंटल माल दुर्गम भागातून रवाना करण्याकरिता आमसूल तयार करणे सुरू आह़े
सातपुडय़ातील नगदी पीक असाही उल्लेख असलेल्या आमसुलाची सर्वात मोठी बाजारपेठ मोलगी ता़ अक्कलकुवा येथे आह़े या बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आह़े कै:या कापून त्या वाळवून त्यापासून तयार केलेले आमसूल पोत्यांमध्ये किंवा खाजगी वाहनाने आदिवासी बांधव मोलगी येथे घेऊन येत आहेत़ पांढ:या रंगानुसार ठरणा:या प्रतवारीने खरेदी विक्री होणा:या आमसुलाचे दर मात्र व्यापारीच निर्धारित करत असल्याची माहिती आदिवासी आंबा उत्पादकांनी दिली आह़े
सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील साधारण दोन हजार 400 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर आंबा झाडांवर कै:यांचा बहर आह़े संपूर्णपणे नैसर्गिक उत्पादन असल्याने या भागातील आंबा आणि कै:यांना मागणी आह़े आदिवासींची जुनी आणि नवीन अशी शेकडो झाडे सातपुडय़ात आहेत़ या झाडांपासून येणा:या आमसूल उत्पादनाला हमीभाव देण्याची मागणी आह़े धडगाव किंवा मोलगी या शहरांमध्ये आमसुलावर प्रक्रिया करण्याच्या उद्योग सुरू करण्याची घोषणा काही वर्षापूर्वी करण्यात आली होती़ त्याचीही प्रतीक्षा कायम आह़े यंदा दुर्गम भागात 90 टक्के कै:यांचे आमसूल उत्पादन होणार आह़े
बहुपयोगी असलेले आमसूल दुर्गम भागात अत्यंत स्वस्त दरात मिळत असल्याने व्यापा:यांची वर्दळ वाढूनही दरांत मात्र वाढ झालेली नाही़ बहुतांश शेतकरी आंब्याची झाडे विकत घेऊन त्याद्वारे आमसूल उत्पादन घेण्यास प्राधान्य देतात़ या झाडावरचे फळ तोडून संपूर्ण कुटूंबच मग आमसूल तयार करत़े राज्यशासनाने दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा या कच्च्या मालाचा हमीभाव जाहीर करून खरेदी केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े यंदा भाव सुरुवातीला स्थिर असले, तरी व्यापारी दरांमध्ये वाढ होऊ देत नसल्याचे सांगण्यात येत आह़े