मुलगा सिव्हील इंजिनियर, मुलगी एमबीए फायनान्स. दोघंही उच्च शिक्षित, सासरची परिस्थितीही चांगली आहे. अशा घटनांमध्ये पूर्वी घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे आले. त्यांनी तातडीन स्थानिक गुन्हे शाखेचे किरण बकाले, सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे व संदीप साळवे यांना कामाला लावले. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला व तेथेच रेखाची दिशा मिळाली. पुण्यात सोबत शिक्षण घेत असलेल्या मैत्रीणीच्या संपर्कात आलेल्या रेखाचे धागेदोरे तिच्याकडून मिळाले. त्यानुसार बडगुजर यांनी हवालदार अनमोल पटेल व महिला कर्मचारी पी.सी.वळवी यांना तातडीने शनिवारी शिरपूरला रवाने केले. तेथील मांडळ गावात रेखाने भाड्याने घर घेतल्याचे समजले. तेथे चौकशी केली असता शिरपुरात गेल्याचे समजले. एका मेडिकलवर बाळाचे औषध घेवून परतत असताना पोलिसांनी रेखाला ताब्यात घेतले. तेथून तिला जळगावात आणले. या वादामुळे तिने सासर व माहेर दोघांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे काकांच्या ताब्यात तिला देण्यात आले.
तंत्रज्ञानामुळे मिळाली रेखाची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:10 AM