जळगाव : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरच्या कारवाईचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पोलीस महासंचालकांनीही तातडीने या संस्थेशी संबंधित सविस्तर व पुराव्यानिशी माहिती मागविली असून शुक्रवारी दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयात याची धावपळ सुरु होती. दुसरीकडे पुण्यातील ठेवीदार आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहचत असून त्यांच्याकडून लेखी तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू झालेले आहे. जळगावात देखील ॲड.कीर्ती पाटील यांच्याकडे देखील ठेवीदार धाव घेत आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर व इतर सहा जण अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.