दीपनगर, ता. भुसावळ : जगभरात कोरोना व्हायरसचा फेलाव होत असताना फेकरी गावांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हागणदारी मुक्तीचाही बोजवारा झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या ठिकाणी स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. गावात गटारी तुडुंब भरलेल्या असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ठीग पसरले आहे. प्लास्टिकसह गटारीत वाढलेली घाण, भर रस्त्यावर जागोजागी पडलेली घाण हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे फेकरी येथील जिप शाळेच्या मागेच मोठा सांडपाण्याचा नाला असून नागरीक डेंग्यू, मलेरिया व कोरोना सारख्या आजारांना देखील बळी पडू शकतात.कचरा कुंड्यांची दुरावस्थाफेकरी गावांमध्ये कचरा कुंड्या ठेव ठेवलेल्या असून त्यांची देखील दुरवस्था झालेली आहे. गावातील नागरिक कचरा हा कुंडीत न टाकता बाहेरच टाकत असल्यामुळे कचºयाचा रस्त्यावरच मोठा ढिगारा तयार होतोकॅरीबॅगचा सर्रास होते वापरपर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडून आदेशाची पायमल्ली होत असून एक-दोन थातूरमातूर कारवाई करून प्लास्टिक विक्रेत्यांवर आता मेहरबानी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दीपनगर येथील सरगम गेट व परिसरातील गावांमध्ये प्लास्टिकचा रोज वापर सुरू असून दीपनगर येथील सरगम गेट वरील दुकानांवर व भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिकच्या कॅरीबॅग उपलब्ध असून ग्राहकांना त्या दिल्या जात आहे. यामुळे दीपनगर, साकरी, फेकरी, निंभोरा , पिपरी सेकम या गावातही कचºयामध्ये प्लॅस्टीकच्या बॅगच मोठ्या प्रमाणात आढळून येतात.हागणदारी मुक्ती फेलगेल्या काही दिवसांपासून महिला व पुरुष जेटीएस ते वरणगाव या रस्त्यावर रात्री-बेरात्री शौचालयात बसत असतात. फेकरी स्वच्छ व हागणदारीमुक्त गाव असल्याचे फलकही दिसून येतात. हे फलक आता केवळ देखावाच ठरत आहे.काळजी घेतली जाईल !गावातील स्थितीबाबत फेकरी येथील ग्राम विकास अधिकारी राकेश मुंडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गावात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र काही ठिकाणी स्वच्छता करणे राहिले असल्यास प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेची काळजी निश्चितच घेतली जाईल.
फेकरी येथे पसरले सर्वत्र घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:20 PM