जामनेर : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनदेखील कार्यवाही होत नसल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार येथील जागृत अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर यांनी व्यक्त केला आहे. संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी पंचायत समिती सभापतींना दिले.अपंगांसाठीचा २०१५ ते २०१९ पर्यंतचा ५ टक्के निधी वाटप करावा, घरकूल योजनेत प्राधान्य द्यावे, ग्राम पंचायतींमार्फत बांधलेल्या व्यापारी संकुलात गाळे मिळावे, रोजगार सेवक पदावर निवड व्हावी, विवाहासाठी अनुदान मिळावे, घरपट्टीत ५० टक्के सूट मिळावी, रिक्त जागेवर नियुक्ती करावी, आदी मागण्याचे निवेदन सभापती नीता पाटील व विस्तार अधिकारी पालवे यांना देण्यात आले.यावेळी विश्वनाथ सुरळकर, गणेश साळुंके, हर्षल पाटील, कैलास कोळी, रवी झाल्टे, पूजा पाटील, अलीयार खान, शांताराम गाडीलोहार यांचेसह अपंग बांधव उपस्थित होते.
मागण्यांसाठी अपंग रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 3:59 PM