मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही जि.प. प्रशासनातर्फे कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ थांबत नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून नाइलाजाने उपचारार्थ रुग्णांना दुसºया दवाखान्यात न्यावे लागत आहे. गेल्या आठवड्यात राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बैठक झाली. त्या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात बहुतेक वेळा अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड होत असते, असे कोणी आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, तरीही मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वैद्यकीय सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. संबंधित कर्मचाºयांसह अधिकाºयांनी मुख्यालयीच थांबावे, याबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये तक्रार केली होती. तरीही ग्रामस्थांच्या या मागणीला केराची टोपली जि.प. प्रशासनाने दाखविली. यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य अधिकाºयांना स्मरणपत्र दिले असतानाही अजून कार्यवाही झालेली नाही. दोन महिलांचा मृत्यू गंभीर अवस्थेतील दोन महिलांना वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या महिलांचा मृत्यू झाला होता. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन उपकेंद्र असून एक देवी येथे, तर दुसरे मालपूर येथील मोहनशेठनगरजवळ आहे. परंतु, तेथेही आरोग्याचा पूर्णत: बोजवारा उडालेला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जि.प. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा व डॉ. जयेश मोरे हे बºयाचदा नसतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. याकडे जि.प. प्रशासनाने लक्ष देऊन येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी थांबतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कैलास पाटील, भरत मिस्तरी, प्रेमराज पाटील, मुकेश उपासनी, अशोक खलाणे, राकेश ठाकरे यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकारी ‘आऊट आॅफ कव्हरेज’सद्य:स्थितीत मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संतोष पावरा व डॉ. जयेश मोरे हे कार्यरत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल क्रमांक ‘आऊट आॅफ कव्हरेज’ आला. तरीही ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुपारी चार वाजता मालपूर केंद्रात भेट दिली असता, दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांपैकी एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.
११ गावातील ग्रामस्थांना अडचणी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ११ गावे जोडली आहेत. त्यात मालपूर, चुडाणे, देवी, अक्कलकोस, सुराय, कलवाडे, कर्ले, परसोळे, वाडी, रुदाणे, आगरपाडा आदी गावातील गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने मालपूरच्या आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. मात्र, तेथे पुरेशा सेवा-सुविधांचा अभाव आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करावयाचे झाल्यास डॉक्टर नसल्याने त्यांना योग्य ते उपचार मिळू शकत नाही. यामुळे इतरत्र अशा रुग्णांना दाखल करावे लागते.