जळगाव : संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालविणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांच्या विरोधात १५ संचालकांनी गुरुवारी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. दरम्यान, हे संचालक रात्रीच सहलीला रवाना झाले.या प्रस्तावावर १७ पैकी १५ संचालकांच्या स्वाक्षºया असून, लकी टेलर यांच्या बाजुला केवळ प्रशांत पाटील हेच संचालक आहेत. ,लकी टेलर हे बाजार समितीमधील कोणताही निर्णय घेताना संचालकाला विश्वासात घेत नसून, यामुळे समितीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.सेना, भाजपा संचालकांचा समावेशबाजार समितीमध्ये भाजपा व शिवसेनेची सत्ता आहे. दरम्यान, अविश्वास दाखल करणाºया संचालकांमध्ये भाजपा व शिवसेनेच्या संचालकांचा समावेश असून यामध्ये उपसभापती वसंत भालेराव, भरत हिमंत बोरसे, मनोहर पाटील, सुरेश पाटील, अनिल भोळे, कैलास छगन चौधरी, सिंधूबाई पाटील, यमुनाबाई सपकाळे, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, सरलाबाई पाटील, प्रकाश नारखेडे,प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, विमलबाई भंगाळे यांचा समावेश आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लकी टेलर यांनी जळगाव ग्रामीण मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१ वर्षाचा कार्यकाळाची होती मुदतलकी टेलर यांचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. डिसेंबर २०१८ मध्ये मुदत संपल्यावरही राजीनामा दिला नाही. तसेच गेल्या महिन्यात देखील त्यांना सभापतीपदाचा राजीनामा देण्याची विनंती काही संचालकांनी केली. मात्र, तरीही राजीनामा न दिल्यामुळे संचालकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली.सभापतीपदाच्या कार्यकाळात जे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मनात भिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी काही संचालकांना आमीष देवून हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. उद्या शुक्रवारी सभापतीपदाचा राजीनामा देणार आहोत.- लक्ष्मण पाटील, सभापती.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:57 PM