मिम्सतर्फे १० लाखांचे पॅकेज जाहीर
जळगाव : कोरोनानंतर उदभवलेल्या कठीण परिस्थितीतही मोशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने आपले आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटचे रेकॉर्ड कायम ठेवले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीनंतर ललिता चव्हाण (आमोदे), पुष्कर शिंदे (धुळे) व लोहित खरपकर (अमरावती ) या विद्यार्थ्यांना दुबई स्थित जीडीएम इंटेरियर्स प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदावर नोकरी मिळाली आहे. ट्रेनिंगनंतर त्यांचे वार्षिक पॅकेज १० लाख इतके असेल. तसेच राज लोहार व मयुर काळे यांचे प्लेसमेंट आरोही इन्फो रिअल इस्टेट येथे करण्यात आले आहे. मागील महिन्यात विवेक चव्हाण व सचिदानंद के यांचे प्लेसमेंट मुंबई येथे करण्यात आले आहे. सुजित पाटील यास बंगलोर येथे प्लेसमेंट देण्यात आले आहे. लवकरच १०० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात मिम्स यशस्वी होईल, असे संचालक नितीन पाटील यांनी कळविले आहे.