आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षकांनी जाऊन घेतलेल्या बैठकीवरून रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात झालेल्या बैठकी दरम्यान पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे , जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व इतर नेत्यांसमोरच वादंग झाले.यावेळी बैठक घेतल्याचे छायाचित्र दाखवा अशी मागणीही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या संजय पवार व ज्ञानेश्वर महाजन यांनी धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्याकडे केली.दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस वाढली असून एकूण नऊ नावे पुढे आली आहेत. जिल्हाध्यक्षपदासह तालुकाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदासाठी आलेली नावे प्रदेशला पाठविली जाणार असून २९ रोजी निवड निवड घोषित होईल, असे निरीक्षक रंगनाथ काळे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी बैठक झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात रविवारी सकाळी पक्ष कार्यालयात पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील, समन्वयक विकास पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, अरुण पाटील, दिलीप सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा कल्पना पाटील, युवक अध्यक्ष ललित बागूल, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष अरविंद मानकरी, विजय चौधरी, राजेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस म्हणून प्रतिनिधींना संधी देण्यात आली. त्यांनी वेगवेगळ््या नावांची शिफारस करण्यासह काहींनी स्वत: इच्छुक असल्याचे सांगितले.
जळगावात राष्ट्रवादीच्या बैठकीत निरीक्षकांसमोर वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:17 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षकांनी जाऊन घेतलेल्या बैठकीवरून रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात झालेल्या बैठकी दरम्यान पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे , जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व इतर नेत्यांसमोरच वादंग झाले.
ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदासाठी ९ जण स्पर्धेतजिल्हाध्यक्षपदाची २९ रोजी होणार निवडआमदार डॉ.सतीश पाटील व अन्य नेत्यांमध्ये वाद