सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : रावेर तालुक्यात सावखेडा, कुंभारखेडा व वाघोदा परिसरात केळी पिकांवर आलेल्या सीएमव्ही व्हायरसमुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा व्हायरस झपाट्याने वाढत आहे. या केळी बागांचे पंचनामे करून उत्पादकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.याबाबत शेतकऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यात केळीवर सीएमव्ही व्हायरस वेगाने पसरत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आजपर्यंत अनेक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर केळी उपटून फेकली आहे. तसेच तालुका कृषी अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करून रोगग्रस्त केळी फेकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सांगितले. तसे न केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतो, म्हणून शेकडो शेतकºयांना रोगग्रस्त केळी पिके फेकून दिली आहेत. तरी प्रति खोडाप्रमाणे शेतकºयांना केळी लागवड खर्च किमान ५० रुपये आला आहे. तो आता वाया गेल्याने शेतकºयांमध्ये संतापाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे व यापुढेही हा व्हायरस किती प्रमाणात इतर केळी खोडांवर आक्रमण करतो, याची चिंता शेतकºयांना भेडसावत आहे.शेतकºयांना थोडा दिलासा मिळावा म्हणून त्यांच्या नुकसानग्रस्त केळीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे व शासनाकडून किंवा रोपे पुरविणाºया कंपनीकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.निवेदनावर रावेर तालुक्यातील विकास पाटील, मनोज पाटील, नीळकंठ चौधरी, विलास ताठे, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, महेंद्र महाजन, पंकज चौधरी, भरत बोंडे, प्रवीण बोंडे, शुभम महाजन, प्रवीण महाजन, रवींद्र महाजन, देवराम बोंडे, रमाकांत बोंडे, अरुण राणे या शेतकर्यांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधिताना पाठविण्यात आल्या आहेत.
रावेर तालुक्यातील सावखेडा परिसरात केळीवर रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 4:09 PM
रावेर तालुक्यात सावखेडा, कुंभारखेडा व वाघोदा परिसरात केळी पिकांवर आलेल्या सीएमव्ही व्हायरसमुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावीप्रशासनाला दिले निवेदन