ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16 - कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ़ अरविंद मोरे यांच्या खून प्रकरणाला पाच दिवस उलटूनही अद्याप मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आह़े दरम्यान शवविच्छेदन अहवाल, पायाच्या ठशांच्या न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आह़े डॉ़ मोरे ताण-तणावात असल्याने त्यांनी आत्महत्या तर केली नाही ना? या दृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आह़ेडॉ़ मोरे यांच्या संपर्कातील दोन हजार जणांच्या मोबाईल सीडीआर पोलिसांनी काढले होत़े त्यानुसार धुळे, शिरपूर, नाशिक येथील संबंधितांची चौकशी करुन जबाब नोंदविण्यात येत आह़े त्यांच्या संपर्कातील महिलांची संख्या लक्षात घेता, अनैतिक संबंधातून तर त्यांची हत्या अथवा त्यांनी आत्महत्या केली असावी? या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीनेही पोलीस संबंधित महिलांची चौकशी करुन जबाब नोंदवित आह़े
डॉ़ मोरे यांच्या हत्याप्रकरणात विविध ठिकाणच्या संशयितांची चौकशी सुरु आह़े ते ताण-तणावात असल्याने आत्महत्या केली केली की काय? यादृष्टीने तपास सुरु आह़े शवविच्छेदन व पायांच्या ठशांच्या न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर नेमक्या कोणत्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला हे कारण समोर येईल़ - दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक