जळगाव : नवरात्रोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला असून घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. आदिशक्तीच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या जळगावकरांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी केली होती.मंगळवारी टॉवर चौकापासून तर घाणेकर चौक, चौबे शाळा, सुभाष चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपासून तर रात्री ७ वाजेपर्यंत प्रचंड गर्दी झाली होती.टॉवरकडून जाणाºया रस्त्यावर थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य, देवीचे वस्त्र यात प्रामुख्याने घट, देवीच्या घरगुती मूर्ती, नारळ, एकत्रित पूजचे साहित्य, टोपल्यांची अनेक दुकाने थाटण्यात आली होती. देवीच्या पूजेला लागणारी फळे, नागवेलीची पाने, नारळ, हळद, कुंकू, चमकीच्या कापडाची दुकाने या परिसरात लागली होती.अजिंठा चौफुली परिसरात देवीच्या मूर्ती खरेदीसाठी जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ तालुक्यातील भक्तांची गर्दी झाली होती.झेंडूची फुले महागलीदुर्गोत्सवासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. दुर्गा मातेला झेंडूच्या फुलांचा हार वाहतात. त्यामुळे अनेकांनी झेंडू फुले विक्रीची दुकाने लावलेली दिसून येत होती. ४० रूपयांपासून ६० रूपये किलोपर्यंत झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी होती.
जळगावात घरोघरी उत्साहात घटस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:12 PM
आदिशक्तीचा जागर
ठळक मुद्देखरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दीपूजेच्या विविध वस्तूंना मागणी